कोकण

अप्पासाहेब म्हणजे समाजाभिमुख नेते

CD

09793
जामसंडे ः अ‍ॅड. अजित गोगटे यांनी मनोगत व्यक्त केले. बाजूला सुनील पारकर, प्रवीण जोग आदी.

अप्पासाहेब म्हणजे समाजाभिमुख नेते

अॅड. अजित गोगटे; देवगडात स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १६ ः अप्पासाहेब गोगटे म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकार्य करणारा खरा लोकनेता होते, असे मत माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे यांनी जामसंडे येथे व्यक्त केले. जामसंडे येथील श्री. मो. गोगटे माध्यमिक विद्यामंदिरमध्ये आयोजित स्मृतिदिन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मंचावर संस्थेचे कार्यवाह प्रवीण जोग, कोषाध्यक्ष रघुनाथ उर्फ राजू काळे, पंचायत समितीचे माजी सभापती सुनील पारकर, राहुल गोगटे, प्रमुख वक्ते संजय गोगटे, मुख्याध्यापिका दीपा मराठे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन झाले. अ‍ॅड. गोगटे यांनी, अप्पासाहेबांनी आपल्या आमदारकीच्या काळात खरी विकास गंगा आणली. रस्ते, वीज, पाणी या मूलभूत गरजा पूर्ण करणारे अप्पा खरे लोकसेवक होते, असे सांगितले. संजय गोगटे यांनी अप्पांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला. राजकारण विरहित समाजकार्याने जनतेचे जीवनमान उंचावण्यात अप्पांचा मोलाचा वाटा होता, असे सांगून त्यांच्या जीवनाचे विविध पैलू उलगडले. श्री. पारकर यांनी अप्पांचे जीवन व कार्य याबाबतच्या आठवणींना उजाळा दिला. मुख्याध्यापिका दीपा मराठे यांनी प्रास्ताविक केले. विनायक ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. संजीवनी जाधव यांनी आभार मानले. दरम्यान, जामसंडे येथील भाजप पक्ष कार्यालयात प्रतिमापूजन करून अप्पांना आदरांजली वाहण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी बंद राहणार

स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात कलाकारांच्या गुरुजनांना मानाचा मुजरा, गुरु-शिष्याची अनोखी जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस

Mumbai News: ताडदेवस्थित वेलिंग्डन हाइट्सचे प्रकरण; तातडीच्या सुनावणीस न्यायालयाचा नकार, कोर्टात काय घडलं?

SCROLL FOR NEXT