१७ (पान २ साठी)
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाला गती
उल्का विश्वासराव ; गवाणे जिल्हा परिषद गटातर्फे सन्मान
लांजा, ता. १६ ः रवींद्र चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला लक्षणीय गती मिळाली, असे प्रतिपादन राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव यांनी केले.
विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून निवड झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या विश्वासराव यांचा तालुक्यातील गवाणे जिल्हा परिषद गटात यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आगामी जिल्हा परीषद आणि पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवून जिंकण्यासाठी विचारांवर चर्चा करण्यात आली. भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष मनोहर भिडे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भाजपा उद्योग आघाडी महिला समिती सहप्रमुख, कोकण विभाग म्हणून कार्यरत असताना उल्का विश्वासराव यांनी राजापूर विधानसभा मतदार संघासाठी भरीव योगदान दिले. साखरीनाटे येथील सुसज्ज बंदरासाठी १५३.५० कोटी रुपये निधी मंजूर झाला. राज्याच्या अर्थसंकल्पात जवळपास १३.५० कोटी रुपये निधी केवळ पूर्व लांजा भागासाठी खेचून आणला. याचे श्रेय लाटण्याचा त्यानंतर अनेकांनी प्रयत्न केला; पण भांबेड जि. प. गटात विश्वासरावांच्या कार्यशैलीवर लोकांचा विश्वास आता दृढ झाला आहे, असे गौरवोद्गार दादा भिडे यांनी काढले. उल्का विश्वासराव म्हणाल्या, रवींद्र चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला लक्षणीय गती मिळाली. लोकांनी सुज्ञपणे, विचारपूर्वक आणि भविष्याचा वेध घेऊन मतदान केल्यास कृषी, पर्यटन, मासेमारी, रोजगार आदी क्षेत्रांत आमुलाग्र परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता आणि राजकीय इच्छा केवळ भाजपाकडे आहे. ‘मोदी अॅट ९’ अभियानाच्या नियोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली. या वेळी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष यशवंत वाकडे, सरचिटणीस चंद्रकांत मांडवकर, वाघोजी खानविलकर, मंगेश भिडे, अशोक मोडक, उपळेचे उपसरपंच आत्माराम धुमक आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.