८ (पान २ साठी)
दुकानदारांचे थेट शाळेशी संपर्क
शालेय साहित्य खरेदी ; किमतीत वाढ
चिपळूण, ता. १६ ः नवीन शैक्षणिक वर्षाला गुरूवारी (ता. १५) पासून सुरवात झाली. शैक्षणिक साहित्याने बाजारपेठ गजबजली आहे. विद्यार्थी आणि पालकांची खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. यंदा शैक्षणिक साहित्याच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे; मात्र पर्याय नसल्यामुळे पालकांना महागड्या शालेय वस्तू विकत घ्यावे लागत आहेत. काही व्यवसायिकांनी आपले साहित्य खपवण्यासाठी थेट शाळांशी संपर्क केला आहे.
गेल्या वर्षी २०० रुपये डझन असणाऱ्या वह्या आता २५० रुपयांवर गेल्या आहेत तसेच ७ रुपयांना मिळणारा साधा पेन आता १० रुपयांना मिळत आहे. २५० रुपयांचे दप्तर ३०० रुपयांना झाले आहे. नामांकित कंपन्यांच्या वह्यांच्या दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. इंधन दरवाढ, मजुरी वाढल्याने साहित्याच्या किमतीत वाढ झाली आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बस आणि रिक्षांच्या भाड्यातही वाढ करण्यात आली आहे. यामुळे पालकांना यंदा साहित्य खरेदी करताना महागाईची झळ सोसावी लागत आहे. व्यवसायासाठी काही दुकानदारांनी थेट शाळांशी संपर्क साधणे सुरू केले आहे.
-----------
कोट
मागील दोन वर्षांपासून वह्यांच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. कच्च्या मालाचे भाव वाढल्याने नामांकित कंपन्यांनी दरवाढ केली आहे. दरवाढ झाल्याने आवश्यक तेवढ्या वह्या व साहित्य घेण्यास पालक प्राधान्य देत आहेत. पालक दरवाढीसाठी विक्रेत्यांना जबाबदार धरतात; मात्र, उत्पादक कंपन्यांनी दरवाढ केल्याने विक्रेत्यांकडे पर्याय उरत नाही. दरवाढ झाल्याने साहित्य खरेदीनंतर पालक आमच्याकडे सवलतीबाबत विचारतात. जुन्या स्टॉकमधील साहित्य द्या, अशी मागणीही पालक करत आहेत.
- राजू कच्ची, स्वामी कॉम्प्लेक्स, चिपळूण
-------------
असे आहेत साहित्याचे दर
पेन - ११ ते २० रु.
वॉटरबॅग - १०० ते ३०० रु.
कंपासपेटी - १०० ते २५० रु.
टिफिन बॉक्स - १५० ते २०० रु.
रेनकोट - २५० ते ६०० रु.
स्कूल बॅग - ३५० रुपयांपासून पुढे
वह्या - २५० ते ३५० रु. डझन
शूज - ४०० ते ८०० रु.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.