मालवाहू गाडीला अपघात, चालकाविरुद्ध गुन्हा
राजापूर ः करक येथे मालवाहू गाडीचा अपघात झाल्याने हौद्यात बसलेल्या दोघांना दुखापत झाली. याप्रकरणी चालकाविरुद्ध राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल धनपाल गणेशवाडे असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता.१४) सायंकाळी करक येथे अर्जुना धरण येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेशवाडे हा मालवाहू वाहन अर्जुना धरण करक ते आरगाव लांजा अशी घेऊन जात असताना वाहन निष्काळजीपणे चालवून अपघात केला. या अपघातात वाहनाच्या हौद्यात बसलेले बनयकुमार मुन्नी बिन (वय २२), सुभाषकुमार शंभू बिन (वय २४, दोघेही रा. पनलाड, ता. बघहार, बिहार) हे जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गणेशवाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
----
गावडेआंबेरेत मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हा
पावस ः तालुक्यातील गावडे आंबेरे येथे आजीशी भांडण केल्यावरून जाब विचारण्यास गेलेल्या फिर्यादी व त्यांच्या वडिलांना मारहाण करणाऱ्या चार जणांविरुद्ध पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. रमण धर्मा नाटेकर, अन्य एक गुरुदास रमण नाटेकर, गौरेश रमण नाटेकर अशी संशयितांची नावे आहे. ही घटना गुरुवारी (ता. १५) सकाळी गावडे आंबेरे आंबेरकरवाडी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि संशयित रमण नाटेकर हे सख्खे भाऊ आहेत. ते विभक्त राहतात. त्यांच्या पूर्वापार वाद असून ते एकमेकांसोबत बोलत नाहीत. फिर्यादी यांची आजी ही संशयित रमण यांच्याकडे राहण्यास गेली होती. फिर्यादी यांची आजी आणि संशयित यांच्यात भांडण झाल्याचे फिर्यादी व त्यांच्या वडिलांना कळल्यावर ते जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी संशयितांनी दोघांनाही लाथाबुक्यांनी मारहाण केली. या प्रकरणी फिर्यादी यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चार संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
-----
महिलेला मारहाण केल्याने गुन्हा
पावस ः भांडणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या संशयिताने फिर्यादीच्या पत्नीला मारहाण केली. या प्रकरणी संशयिताविरुद्ध पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परशुराम धर्मा नाटेकर असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १५) सकाळी साडेआठच्या सुमारास गावडेआंबेरे येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व संशयित हे सख्खे भाऊ आहेत. गुरुवारी फिर्यादी यांची आई व पत्नी यांच्यात भांडण झाले. त्याबाबत संशयिताने फिर्यादी यांच्या घरी जाऊन फिर्यादी यांच्या पत्नीस लाकडी दांड्याने मारून मारहाण करून दुखापत केली. या प्रकरणी फिर्यादी यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.