कोकण

शैक्षणिक भरारी घेऊन समाजऋण फेडा

CD

09829
शिडवणे ः येथील शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रमात मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
(छायाचित्र : एन. पावसकर)

शैक्षणिक भरारी घेऊन
समाजऋण फेडा ः जठार

शिडवणे शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात

तळेरे, ता. १६ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिडवणे नं. १ शाळेमध्ये पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. मोफत गणवेश, शैक्षणिक साहित्याचे वाटप करून मुलांना विविध लाभ मिळत आहेत, ही गौरवास्पद बाब आहे. मुलांनी याचे भान ठेवून अधिक अभ्यास करून समाजाप्रती ऋण फेडावेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती रवींद्र जठार यांनी शिडवणे येथे प्रवेशोत्सव कार्यक्रम प्रसंगी केले.
प्रारंभी पहिलीच्या मुलांचे औक्षण करण्यात आले. वाजतगाजत नवागतांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते देवी सरस्वती माता आणि गणेशमूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आले. मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी स्वागत केले. शाळा प्रवेशोत्सव आणि ‘निपुण भारत’ अंतर्गत सुरू असलेल्या कार्यक्रमाबद्दल कुबल यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर पहिली ते सातवीच्या एकूण ५१ मुलामुलींना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली. रामदास टक्के आणि ललिता टक्के यांच्या सौजन्याने शालेय साहित्य वाटप करण्यात आले. आर्या कोकाटे हिने सर्व मुलांना पेनांचे वाटप करून नवीन शैक्षणिक वर्षासाठी मुलांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला शिडवणे सरपंच रवींद्र शेट्ये, उपसरपंच दीपक पाटणकर, बंडू कोकाटे, मनोहर कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य दयानंद कुडतरकर, स्मिता टक्के, सुप्रिया पांचाळ, ललिता टक्के, तंटामुक्ती अध्यक्ष तथा माऊली वारकरी संप्रदायाचे पदाधिकारी महेंद्र टक्के, आर्या कोकाटे, पोलिस पाटील समीर कुडतरकर, माजी उपसरपंच अनिल पांचाळ, सचिन टक्के, तारीफ शेख, नदीम शेख, रामचंद्र पाटणकर, शाळा व्यवस्थान समिती उपाध्यक्षा तथा शालेय पोषण आहार स्वयंपाकी समिता सुतार, प्रेरणा कासार्डेकर, आन्वी येतकर, मंजुळा गुंडये, अंगणवाडी सेविका पाटणकर, केतकर, गणेश पाष्टे उपस्थित होते. स्मिता टक्के यांची शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. मावळते सदस्य अनिल पांचाळ यांना गौरविण्यात आले. मुख्याध्यापक कुबल यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Transfer: मोठी बातमी! पोलीस विभागात महत्त्वाचा फेरबदल; चार आयपीएस आणि दोन राज्य पोलीस अधिकाऱ्यांची बदली, कारण काय?

Viral Video : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकताच, शिवम दुबे ट्रेनने तातडीने मुंबईसाठी रवाना का झाला? भारतीय खेळाडूने सांगितलं कारण...

IPL 2026 : इशान किशन कर्णधार, अभिषेक शर्माकडे उप कर्णधारपद... संघात खांदेपालट... आणखी एक अचंबित करणारा निर्णय

Social Media Restriction: मोदी सरकारचा मोठा निर्णय! AI व्हिडीओ हटवले जाणार; अनेक विभागांना मिळणार कंटेंट काढण्याचे अधिकार

Education News : पालकांना मोठा दिलासा! आरटीई प्रवेशासाठी १ किमीची अट रद्द; आता ५ किमीपर्यंतच्या शाळा निवडता येणार

SCROLL FOR NEXT