महायात्रेचा लोगो १५जूनच्या पान ५ वरून घेणे...
(तीन बातम्या आहेत. चौकटीत घ्याव्यात.)
फोटो ओळी
-rat१६p३०.jpg- KOP२३M०९८३० रत्नागिरी ः ''सकाळ'' एज्युकेशन महायात्रेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विक्रम परांजपे.
------------
चित्रकलेत पदविका, पदवीनंतर जगाची दारे खुली
प्रा. विक्रम परांजपे ; चित्रकला क्षेत्रात भरपूर संधी
रत्नागिरी, ता. १६ ः पैसा हे सर्वस्व नाही; परंतु चरितार्थासाठी पैसे लागतात. फक्त चित्रकार, कलाकार ग्राफिक डिझायनर, अॅनिमेशन या सर्व क्षेत्रात कलाकार म्हणून नाव मिळवू शकता आणि भरपूर पैसेसुद्धा मिळवू शकता. कोकणात राहूनच आपण चित्रकलेचा पदविका आणि पदवी अभ्यास पूर्ण करू शकता. मग तुम्हाला जगाची दारे खुली आहेत, असे प्रतिपादन डी- कॅड, देवरूख कला महाविद्यालयाचे प्रा. विक्रम परांजपे केले.
''सकाळ'' एज्युकेशन महायात्रेच्या शेवटच्या दिवशी प्रा. परांजपे यांनी व्याख्यान दिले. त्यांनी चित्रकला विषयातील संधी या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले, मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टनंतर देवरूखच्या डी-कॅड महाविद्यालयाचे नाव आहे. पहिल्या पाच क्रमांकांमध्ये डी-कॅडचे विद्यार्थी झळकतात. त्यामुळे विद्यापिठात कोकणचा झेंडा रोवला गेला आहे. आपला कोणताही विद्यार्थी बेरोजगार म्हणून बसून नाही तर कलाकार म्हणून उत्तम काम करत आहे. आपण चित्र का काढतो? आनंदासाठी, विरंगुळा म्हणून किंवा अन्य काही कारणे असतात. शालेय जीवनात एलिमेंटरी, इंटरमिजिएट या परीक्षा विद्यार्थ्यांनी द्याव्यात. विद्यार्थ्यांना पदवी, पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भरपूर संधी उपलब्ध आहेत, असे त्यांनी सांगितले.
फोटो ओळी
-rat१६p३१.jpg- KOP२३M०९८३१बोलताना प्रा. अमितकुमार कुमठेकर.
---------
शालेय जीवनापासूनच
स्पर्धेची सवय हवी- प्रा. कुमठेकर
रत्नागिरी, ता. १६ ः विद्यार्थ्यांना पाचवी- सहावीपासूनच विविध प्रकारच्या शालाबाह्य परीक्षा देण्याची सवय व्हायला हवी. त्यांना प्रश्न पडले पाहिजेत. भविष्यात नवनवीन अभ्यासक्रम येत आहेत. विद्यार्थी बहुआयामी व अष्टपैलू होण्यासाठी पालकांनीही त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन पन्हाळा, कोल्हापूर येथील फोर्ट इंटरनॅशनल अॅकॅडमीचे प्रा. अमितकुमार कुमठेकर यांनी केले.
प्रा. कुमठेकर यांनी विविध विद्याशाखांचा थोडक्यात आढावा घेतला. विद्यार्थी कसा घडला पाहिजे, याबाबत सुरेख व मोजक्या शब्दांत विवेचन केले. त्यांनी फोर्ट इंटरनॅशनल अॅकॅडमीसंदर्भात थोडक्यात माहिती दिली. व्याख्यानात ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर खूपच कमी वेळ करावा. पुस्तक वाचन केले पाहिजे. जगभरात काय सुरू आहे याची माहिती घ्यावी. विज्ञानशाखेतील विद्यार्थी हा चौकस असतो. त्याला प्रश्न पडत असतात. स्पर्धा परीक्षा द्याव्यात; परंतु जागा कमी असतात आणि लाखो विद्यार्थी ही परीक्षा देत राहतात. वारंवार अपयश येत राहिले तर दुसरा मार्ग शोधावा. कारण, घरच्यांचाही विद्यार्थ्यांवर दबाव असतो. अशावेळी आपल्या आवडीच्या व भविष्य उज्ज्वल होईल, असा करिअरचा दुसरा मार्ग शोधणे फायदेशीर ठरते. प्रगत असलेल्या अमेरिकेमध्ये एका प्रश्नाला आठ पर्याय दिले जातात. भारतात चारच पर्याय दिले जातात. आपले विद्यार्थी या परीक्षेसाठीही तयार व्हायला हवेत, असे प्रा. कुमठेकर यांनी सांगितले.
------
नॅनो तंत्रज्ञान भविष्याचा राजमार्ग- डॉ. प्रमोद कसबे
रत्नागिरी, ता. १६ ः नॅनो तंत्रज्ञान हा तंत्रज्ञानाच विश्वाच्या भविष्याचा एक कालसुसंगत व उदयोन्मुख राजमार्ग आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापिठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स अॅंड बायोटेक्नॉलॉजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रमोद कसबे यांनी केले. ''सकाळ'' एज्युकेशन महायात्रेत त्यांनी आज व्याख्यान दिले. त्यांनी नॅनोसायन्स आणि नॅनोतंत्रज्ञानाचा इतिहास सांगितला. यावर आधारित उपकरण, संशोधनाच्या व्हिडिओद्वारे उपस्थितांमध्ये या तंत्रज्ञानाबद्दल कुतुहल निर्माण केले. उत्तरार्धात शिवाजी विद्यापिठात उपलब्ध बीएसस्सी, एमएस्सी नॅनोसायन्स अभ्यासक्रमाबद्दल माहिती दिली. देशात हा अभ्यासक्रम विद्यापिठात प्रथम सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रदर्शनात २९ स्टॉल मांडण्यात आले होते. याचे प्रायोजक संजय घोडावत विद्यापीठ प्रस्तुत, पॉवर्ड बाय फोर्ट इंटरनॅशनल डिफेन्स अॅकॅडमी, कोल्हापूर एम. आय. टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि सहप्रायोजक पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सांगली, संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट- मिरज, आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च सेन्टर-विटा हे होते. तसेच डायमंड प्रायोजक के. आय. टी. अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर, संत गजानन महाराज ग्रुप ऑफ एज्युकेशन, गडहिंग्लज, डी. के. टी. ई, इचलकरंजी, नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड पॉलिटेक्निक, पेठ, डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट, जयसिंगपूर होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.