09840
धामापूर : बौद्धवाडी शाळेच्यावतीने नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना पालक, ग्रामस्थ, अन्य मुले व शिक्षक.
धामापूर शाळेत प्रवेशोत्सव,
प्रभात फेरीलाही प्रतिसाद
ओरोस, ता. १६ ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामापूर-बौध्दवाडी शाळेत शाळा प्रवेशोत्सव व शाळा पूर्वतयारी मेळावा क्र. २ उत्साहात झाला.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षाची सुरुवात काल (ता. १५) झाली. मालवण तालुक्यातील एक आदर्श उपकमशील शाळा धामापूर बौध्दवाडी शाळेत पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव घेण्यात आला. सकाळी ग्रामस्थ व आजी माजी विद्यार्थी पालक यांच्या उपस्थितीत प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर शाळेत नव्याने दाखल होणाऱ्या चार मुलांचे औक्षण करून वाजतगाजत शाळेत प्रवेश देण्यात आला. त्यानंतर पालकांच्या उपस्थितीत गावच्या माजी सरपंच सप्तशीला धामापूरकर यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके व शालेय गणवेश वितरित करण्यात आले. गावाच्या माजी सरपंच धामापूरकर यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमानंतर शाळा पूर्वतयारी मेळावा क्र. २ घेण्यात आला. एकूण सात स्टॉलची मांडणी करून त्यावर मुलांना कृती घेण्यात आल्या. यात शाळेच्या सर्व मुलांनी सहभाग दर्शविला. अनेक पालकांनी देखील सहभाग घेतला. सेल्फ पॉइंट विशेष लक्षवेधी ठरला. शाळेचे शिक्षक दीपक गोसावी यांच्या नियोजनाचे पालकांनी कौतुक केले. सर्वांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक गोसावी यांनी मानले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमसाठी गावच्या माजी सरपंच धामापूरकर, शीतल नाईक, अंगणवाडी सेविका, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंजिता धामपूरकर, शैलेश धामापूरकर, संदेश धामापूरकर, संतोष कदम, संजना जाधव, सुमिता नाईक, वैशाली कोचरेकर, विद्या कदम, सुरभी नाईक, सोनम कदम, अनुरुपा कदम, शमिका चेंदवणकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.