कोकण

ठाकर कला संग्रहालयास 25 लाख अनुदान मंजूर

CD

10069
पिंगुळी ः पद्मश्री परशुराम गंगावणे यांचे अभिनंदन करताना संजय पडते, अतुल बंगे, मंदार शिरसाट, राजू गवंडे, संदीप म्हाडेश्वर आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

ठाकर कला संग्रहालयास
२५ लाख अनुदान मंजूर
कुडाळ, ता. १८ ः पिंगुळी येथील पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या वस्तुसंग्रहालयाला २५ लाख अनुदान मंजूर झाले आहे. पिंगुळी येथील ठाकर लोककलेचे जनक पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी ठाकर समाजाची लोककला साता समुद्रापार नेली. देशी-विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने त्यांच्या या वस्तुसंग्रहालयाला भेट देतात. ठाकर लोककलेच्या वस्तुसंग्रहालयाला विशाल रूप प्राप्त व्हावे, यासाठी गंगावणे यांनी जिल्हा परिषदेकडे गेल्या दोन वर्षांपासून अनुदनाची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीसाठी आमदार वैभव नाईक, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. या सर्वांच्या प्रयत्नांना यश येऊन ठाकर लोककला वस्तू संग्रहालयासाठी २५ लाख निधी मंजूर झाला. याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख पडते, कुडाळ नगराध्यक्ष मंदार शिरसाट, शिवसेनेचे अतुल बंगे, कुडाळ ओबीसी शिवसेना शहरप्रमुख राजू गवंडे, युवा सेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर यांनी गंगावणे यांच्या निवासस्थानी जाऊन, तर आमदार वैभव नाईक यांनी भ्रमणध्वनीद्वारे त्यांचे अभिनंदन केले. यामुळे ठाकर समाज लोककला व वस्तुसंग्रहालय पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल, असे गौरवोद्गार यावेळी आमदार नाईक काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठी घसरण! मुंबई-पुण्यात सोनं-चांदी स्वस्त; पाहा आजचा ताजा भाव

येरवडा मनोरुग्णालयापेक्षा जनावरांचा गोठा बरा! उग्र वास, अस्वच्छ वॉर्ड अन् रुग्णांनाच जुंपलंय कामाला; आलबेल असल्याचा दावा फोल

DC vs GT, Video: आधी रागात बॅट निसटली, मग फिल्डरकडं पाहिलं अन् ग्लेन फिलिप्स काही क्षणात जोरात धावू लागला; नेमकं काय घडलं?

'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेतील चैत्राली गुप्तेची बहिण आहे प्रसिद्ध अभिनेत्री! सुपरहिट सिनेमांमध्ये केलय काम

Beed Tehsildar Death : लातूर-अंबाजोगाई महामार्गावर भीषण अपघात; केजचे तहसीलदार जागीच ठार, महसूल विभागात शोककळा

SCROLL FOR NEXT