कोकण

इंटरनेट टेक्नॉलॉजी कंपनीसाठी कुडाळ येथे 27 ला मुलाखती

CD

इंटरनेट टेक्नॉलॉजी कंपनीसाठी
कुडाळ येथे २७ ला मुलाखती

कुडाळ, ता. १८ ः जस्ट डायल लिमिटेड मुंबई या आयटी कंपनीसाठी गोवा व सिंधुदुर्ग या ठिकाणी पदवी व पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधून किमान ५० उमेदवार नियुक्त करावयाचे आहेत. जिल्ह्यातील इच्छुक व गरजू पात्र उमेदवारांनी बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूरतिठा (ता. कुडाळ) येथे मंगळवारी (ता. २७) सकाळी अकराला होणाऱ्या कॅम्पस मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष शशिकांत अणावकर व सचिव डॉ. अरुण गोडकर, प्राचार्य डॉ. संभाजी शिंदे यांनी केले आहे.
यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. या इंटरनेट टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये किमान दोन लाख ते तीन लाख रुपयांचे पॅकेज असून कार्यकुशल उमेदवारांना अधिकचे वाढीव लाभ मिळणार आहेत. या मुलाखतीसाठी केवळ पुरुष पदवीधारकांनाच प्राधान्य राहील. संवाद कौशल्य असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा. उमेदवारांना सर्टिफाइड इंटरनेट कन्सल्टंट म्हणून अथवा फिल्ड सेल्स जॉब करावा लागेल. निवडलेल्या उमेदवारांना ग्रॅच्युइटी, वैद्यकीय विमा, अपघात विमा आदी फायदे मिळतील. महाविद्यालयाच्या www.pbvm.co.in या संकेतस्थळावर Facilities या सेक्शनमध्ये Training & Placement वर क्लिक करून २५ जूनपर्यंत मुलाखतीसाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT