कोकण

मतिमंदाच्या अभ्यासक्रमासाठीचा पथदर्शी प्रकल्प पूर्ण

CD

३ (टुडे पान ३ साठी, अँकर)

-rat१८p२०.jpg-
२३M१००९७
रत्नागिरी ः आविष्कार संस्था व जिल्हा शिक्षण, प्रशिक्षण संस्थेतर्फे स्वयंसेतू पथदर्शी प्रकल्पात सहभागी शिक्षक, अधिकारी.
----

गतीमंदाच्या अभ्यासक्रमाचा प्रकल्प पूर्ण

११ सर्वसाधारण शाळांतील २३ दिव्यांग विद्यार्थी ; राज्यस्तरावर मांडणार


रत्नागिरी, ता. १८ ः जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि आविष्कार संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नातून स्वयंसेतू हा गतीमंद यांच्या अभ्यासक्रमासाठीचा पथदर्शी प्रकल्प नुकताच पूर्ण झाला. नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या ११ सर्वसाधारण शाळांत शिकणाऱ्या २३ दिव्यांग विद्यार्थ्यांना यात समाविष्ट केले होते. समावेशित शिक्षणासाठी या प्रकल्पाचा उपयोग होणार आहे.
या प्रकल्पाचा समारोप समारंभ शनिवारी आविष्कार संस्थेत झाला. या वेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याते डॉ. संदीप पवार, केंद्रप्रमुख अमर घाडगे, जिल्हा परिषद आणि नगरपालिकेचे प्रकल्प समाविष्ट असलेल्या शिक्षक व मुख्याध्यापक, आविष्कार संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. आविष्कार संस्थेने नोव्हेंबर २०२२ मध्ये स्वयंसेतू हा गतीमंद मुलांच्या अभ्यासक्रमासाठीचा आराखडा तयार करून त्याचे प्रकाशन केले. त्यानंतर रत्नागिरीमधील सर्वसाधारण शाळेत शिकणाऱ्या गतीमंद मुलांच्या अभ्यासक्रमासाठी हा प्रालेख वापरता येईल का व त्याची परिणामकारकता अभ्यासण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबवता येईल का याकरिता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे सहकार्य व मार्गदर्शन मागितले. त्यानंतर ११ शाळांमध्ये डिसेंबर २०२२ ते एप्रिल २०२३ या दरम्यान प्रकल्प राबवला. त्यातील २३ दिव्यांग विद्यार्थ्यांबरोबर या प्रालेखाचे काम करण्यात आले.
या प्रकल्पाची माहिती मानसशास्त्रज्ञ सचिन सारोळकर यांनी दिली. कार्यक्रमात संस्था, शिक्षकांना जाणवलेल्या मुद्द्यांबाबतचे विस्तृत विश्लेषण आविष्कारच्या शिक्षिका मानसी कांबळे यांनी केले. आविष्कार शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली जोशी यांनी संस्थेची वाटचाल मांडली. कार्यशाळा विभागाचे प्रमुख सचिन वायंगणकर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. पवार यांनी या प्रालेखाची परिणामकारकता सांख्यिकी व गुणात्मक दृष्टिकोनातून सर्वांसमोर सादर केली. शिळमधील शिक्षक सय्यद यांनी प्रकल्पातील अनुभव सांगितला. शिरगावचे केंद्रप्रमुख अमर घाडगे यांनी या प्रकल्पाची मांडणी केल्याबद्दल आविष्कार संस्थेचे कौतुक केले. संस्था सचिव संपदा जोशी यांनी शिक्षण विभाग, सहभागी संस्था शाळा व शिक्षकांचे आभार मानले.
----
कोट
रत्नागिरी जिल्ह्यातील व कदाचित राज्यातील पहिल्या वेळेला या प्रकल्पासाठी मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय होताच. हा प्रकल्प डायटतर्फे राज्यस्तरावर मांडण्यात येईल. विविध मासिकातून हा प्रकल्प प्रकाशित करण्यात येईल.
- डॉ. संदीप पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT