कोकण

शेतकरी समूहगटाला 25 लाखांचे अर्थसहाय्य

CD

७ (पान २ साठी)

शेतकरी समूहगटास २५ लाखांचे सहाय्य

जलयुक्त शिवार योजना ; २३४ शेतकरी गटांची नोदणी

रत्नागिरी, ता. १८ ः जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्‍या टप्प्यात कोकणाला प्राधान्य देताना सामूहिक सिंचन व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेत शेतकरी समूहगटाला २५ लाखांचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेत कोकणातील २३४ शेतकरी गटांची नोदणी झाली असून, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या कामात हेक्टरी लाखाची मदत देण्यात येणार आहे.
योजनेत प्राधान्याने कोकणाचा समावेश करताना शेतकरी समूहगटांची स्थापना करुन शेतकरी गट एक कृषी कंपनी म्हणून सक्रिय करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा कोकणातील तीन जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. त्यासाठी अभियानात सामूहिक सिंचन योजनांचा समावेश करण्यात आला आहे. पाण्याचे स्रोत बळकट करणे, पाणी उपशासाठी पुरेशा अश्वशक्तीचे पंप, सौर किंवा विद्युतजोडणी, पाण्याच्या साठवणुकीसाठी शेततलाव अथवा टाकी बांधणे, जलस्रोतापासून साठवण स्थळापर्यंत जलवाहिनी टाकणे आदी कामे केली जाणार आहेत.
सामूहिक सिंचन योजनेतील शेतकरी गट नेमके कसे, कोणत्या जिल्ह्यात तयार होणार याबाबत अद्याप सुस्पष्टता नाही. या विषयावर जलसंधारण विभागाकडून काम सुरू आहे. मात्र शेतकरी गटांची नोंदणी ‘आत्मा’ अंतर्गत करण्यात येणार आहे. क्षेत्राच्या प्रमाणात झालेला खर्चदेखभाल दुरुस्तीचा खर्च करण्यासाठी गटातील शेतकऱ्यांची सहमती बंधनकारक केली आहे. पाणी साठवणुकीसाठी सुविधा असावी. ही सुविधा नसल्यास जागा किंवा टाकी भाडेकरारावर घेण्याची मुभाही योजनेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Uttarakhand: उत्तरकाशीत पावसाचे थैमान; ८० ट्रेकर्सची सुटका, उर्वरितांच्या बचावासाठी बचावासाठी ८ हेलिकॉप्टर्स मैदानात video viral

Marathi News Live Updates: दुष्काळाने ऊसही कडू केला; दिवाळी तोंडावर असताना महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उभा ऊस विकण्याची वेळ

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT