कोकण

खाडीच्या माशांचे दर वधारले

CD

२४ (पान ८ साठी, अॅंकर)


- rat१८p२५.jpg-
२३M१०१४७
रत्नागिरी ः सहाशे रुपय दर मिळालेला खेकडा.
-----------

खाडीच्या माशांचे दर वधारले

खवय्यांची पंचाईत ; मोठा खेकडा सहाशे रुपयाला

रत्नागिरी, ता. १७ ः समुद्रातील मासेमारी बंद असल्यामुळे सध्या खाडीच्या माशांना मागणी वाढली आहे; पण अपेक्षित मासे नसल्याने दर वधारले आहेत. दोनशे ते तिनशे रुपयांना मिळणारे खेकडे सहाशेवर तर पावसात मिळणारे काकई, तिसरे, लेपी, सुळे, कांटा, ताऊज यासारखी मासळीही पाचशे ते सहाशे रुपये किलोनी विकली जात आहे. मासे खवय्यांची पंचाईत झाली असून अनेकजणं चिकनकडे वळू लागले आहेत. तिथेही किलोचा दर नेट २८० ते २९० रुपयांवर पोचला आहे.
मोसमी पावसाने पाठ फिरवल्यामुळे कोकण किनारपट्टीवर जुनच्या पहिल्या पंधरवड्यात कडकडीत उन पडलेले आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्रही खवळलेला आहे. १ जुनपासून समुद्रातील मासेमारी बंद करण्यात आली. त्यानंतर खाडीमध्ये मासेमारीला सुरवात झाली. पावसाला किनारी भागात येणारे मासेही सापडू लागले आहेत. या माशांचे प्रमाणे कमी असल्याने खवय्यांची पंचाईत झाली आहे. रत्नागिरी शहराजवळील राजीवडा आणि मिरकरवाडा बंदरावर माशांची खरेदी-विक्री मोठ्याप्रमाणात होते. हंगामामध्ये ताजे मासे खरेदीसाठी अनेकजणं सकाळी व सायंकाळी तिथे हजेरी लावतात. रविवारी (ता. १८) गेलेल्या खवय्यांना माशांचे दर चांगलेच वधारलेल पहायला मिळाले. मासे खरेदी करताना अनेकांच्या खिशाला चाट बसली. मोठा खेकडा ६०० रुपयाला एक या प्रमाणे विकला जात होता. तिसरे किंवा मुळे १५० रुपये शेर होते. ते शंभर रुपयांनी विकले जातात. पावसाळ्यात मिळणारा ताऊज मासा खरेदीसाठी अनेकांची झुंबड उडते. याला २५० ते ३०० रुपये अर्धा किलो दर आहे. किलोला ५०० ते ६०० रुपये आकारले जात आहेत. बोयरं, रेणवी हे मासेही याच दराने विकण्यात येत आहेत. लेपी, सुळे, कांटा, खाडीची कोळंबी यासारखी मासळी विक्रीला ठेवण्यात आली होती. त्याचेही दर वधारलेले आहेत. सध्या कोकणात आकाडीचा सण साजरा होत असल्यामुळे चिकन, मटणाला मोठी मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT