कोकण

सामाजिक बांधिलकीतर्फे ''त्या'' कुटुंबास मदत

CD

10164

सामाजिक बांधिलकीतर्फे
जळीतग्रस्त कुटुंबास मदत
सावंतवाडी, ता. १८ : सामाजिक बांधिलकीच्या वतीने संकटात असलेल्या कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू व रोजगाराचे माध्यम देण्यात आले.
बाहेरचावाडा येथील एका झोपडीला महिन्याभरापूर्वी आग लागून ती पूर्णपणे जळली होती. यात कष्ट करून मिळवलेल्या संसारातील सर्व वस्तू व रोजगाराचे माध्यम असलेली शिलाई मशीन सहित लग्नसराईमध्ये ग्राहकाचे शिवणकामासाठी घेतलेले साड्या, ब्लाऊज सुद्धा जळून खाक झाले होते. त्यामुळे त्या गरीब कुटुंबावर फार मोठे संकट ओढले होते. सामाजिक बांधिलकीने या कुटुंबास मदतीचा हात देऊन जीवनावश्यक वस्तू, भांडीकुंडी व रोजगाराचे माध्यम म्हणून शिलाई मशीन सुपूर्द केली. यासाठी भांड्यांच्या स्वरूपात दत्तप्रसाद गोठोस्कर व अपर्णा कोठावळे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. या वेळी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते संजय पेडणेकर, प्रा. सतीश बागवे, प्रा. शैलेश नाईक, प्रा. प्रसाद कोदे, समीरा खालील, शेखर सुभेदार, शरद पेडणेकर, हेलन निबरे, अॅड. अशोक पेडणेकर, शामराव हळदणकर, रवी जाधव व फुल विक्रेते प्रसाद (दादा) परब उपस्थित होते. सामाजिक बांधिलकीच्या सर्व कार्यकर्त्यांचे या कुटुंबाने मनःपूर्वक आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्या; परीक्षा होण्यापूर्वीच समाजमाध्यमात प्रश्नपत्रिका प्रसारित

Buldhana News : गरिबीमुळे लग्न जुळत नाही, बुलढाण्यात दोन तरुणांनी जीवन संपवलं

LSG vs RR Live: रिषभ पंतचा 'Super Duper' झेल; राजस्थानचे सुरमा फेल... शमीची हॅटट्रिक हुकली पण, निम्मा संघ ७७ धावांवर गार Video

Latest Marathi News Live Update: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत माझे चांगले संबंध- खासदार अशोक चव्हाण

Cyber Fraud : व्हॉट्सॲप लिंक, बनावट ईमेल व ‘डिजिटल अरेस्ट’च्या आमिषाने पुण्यात ४८ लाखांची सायबर फसवणूक

SCROLL FOR NEXT