कोकण

‘राखायला हवी निजखूण’चा मिरज येथे पुरस्काराने गौरव

CD

13310
मिरज ः ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर यांच्या हस्ते ‘राखायला हवी निजखूण’ काव्यसंग्रहास राज्यस्तरीय काव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘राखायला हवी निजखूण’चा
मिरज येथे पुरस्काराने गौरव
कणकवली,ता. २ : ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर यांच्या हस्ते कवयित्री सरिता पवार यांच्या ‘राखायला हवी निजखूण’ या काव्यसंग्रहाला सारांश मासिकाच्यावतीने राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट मुखपृष्ठ पुरस्कार काव्यसंग्रह मुखपृष्ठाचे चित्रकार नामानंद मोडक यांना देण्यात आला. सन २०२२ मधील साहित्य कृतींसाठी जाहीर झालेल्या पुरस्कारांचे वितरण मिरज येथील बायसिंगर स्मृती ग्रंथालयात नुकतेच झाले.
यावेळी व्यासपिठावर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक भीमराव धुळूबूळ, डॉ. विनोद परमशेट्टी यांच्यासह कामगार आयुक्त अनिल गुरव, मिरज आय. एम. ए. चे अध्यक्ष डॉ.नथानियल ससे, सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र कुल्लोळी, डॉ. विल्यम इसापुरे, दीपक ढवळे, मासिक सारांशचे रंगराव शिंपुगडे, सल्लागार संपादक डॉ.अनिल दबडे, उपसंपादक डॉ.विजयकुमार माने, डॉ.दीपक कामले, प्रकाश माने, ऋजुता कुलकर्णी, श्रीशैल चौगुले, नीता शिराळकर, त्रिशला शहा, आशा धनाले आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर यांनी स्त्रियांच्या साहित्याचा आढावा घेताना पुराणातील सीता, द्रौपदी तसेच लोक साहित्यातील ओव्यांचे समर्पक दाखले दिले. कवयित्री सरिता पवार यांच्या ‘राखायला हवी निजखूण’ या काव्यसंग्रहाला याआधीही राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. संविधानिक मूल्यांवर आधारित संयत विद्रोहवादी असलेल्या आणि मानवतावाद जोपासणाऱ्या सकारात्मक कविता हे काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच अल्पावधीत वाचक आणि परीक्षकांच्या पसंतीस उतरलेला काव्यसंग्रह म्हणून ‘राखायला हवी निजखूण’ची मराठी साहित्य विश्वात दखल घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापरे! लोकप्रिय अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू, वयाच्या ३० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Gold Price Crash : सोनं-चांदी स्वस्त झालं की गुंतवणूक बुडाली? 24 दिवसांत किमतीत तब्बल 60 हजारांची घसरण; काय घडतंय बाजारात? गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

Latest Marathi News Live Update : भोंदू बाबा अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिरासाठी राज्य सरकारकडून दीड कोटींचा निधी मंजूर

US Iran War Victory : अमेरिकेने युद्ध जिंकल्याचा ट्रम्प यांचा दावा, म्हणाले- इराणने आम्हाला मोठं गिफ्ट पाठवलं

Hotel Close Ratnagiri : रत्नागिरीत २५० हॉटेलचे ‘शटर बंद’, शिवभोजन थाळीही बंद सर्वसामान्यांची फरफट

SCROLL FOR NEXT