कोकण

चिपळूण ःकचरा प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोसळली दरड

CD

फोटो ओळी
-rat३p२.jpg ः M१३५३२ चिपळूण ः कचरा व्यवस्थापन प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोसळलेली दरड.
--------------

कचरा प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोसळली दरड

काहीकाळ वाहतूक ठप्प ; पालिकेच्या त्वरित कार्यवाहीने मार्ग मोकळा

चिपळूण, ता. ३ ः शहरातील शिवाजीनगर येथील कचरा व्यवस्थापन प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रविवारी सकाळच्या सुमारास दरड कोसळली. माती, दगड आणि झाडेझुडपे रस्त्यावर येऊन मार्ग बंद झाला होता. त्यामुळे या प्रकल्पाकडे जाणाऱ्या नगर पालिकेच्या गाड्यांची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. याबाबत माहिती मिळताच चिपळूण नगर पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत ती दरड बाजूला केली. त्यानंतर तेथील वाहतूक सुरळीत झाली.
गेल्या काही दिवसांपासून चिपळूण शहर व तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. रविवारीही पहाटेपासून संततधार सुरू होती. याचदरम्यान सकाळी शिवाजीनगर येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ते कचरा व्यवस्थापन प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अचानक दरड कोसळली. या वेळी वाहने नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या दरडीतील माती, दगड व झाडे रस्त्यावर आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता. यामुळे कचरा प्रकल्पाच्या जागेत टाकण्यासाठी गाळ घेऊन जाणाऱ्या वाहनांचाही मार्ग बंद झाला. कचरा प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर दरड कोसळल्याची माहिती चिपळूण नगर पालिका प्रशासनाला दिली. त्याची तातडीने दखल घेत मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी ती दरड बाजूला करण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. त्यानुसार प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, अनंत मोरे, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक महेश जाधव व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव देत जेसीबीच्या साहाय्याने ती दरड बाजूला केली व वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT