कोकण

सावंतवाडीत एसटीचे अधिकारी धारेवर

CD

13581
सावंतवाडी ः एसटी आगारातील अधिकाऱ्यांशी चर्चा करताना मनसे पदाधिकारी.

सावंतवाडीत एसटीचे अधिकारी धारेवर

मनसे आक्रमक; बसस्थानकातील समस्यांबाबत जाब

सावंतवाडी, ता. ३ ः बसस्थानक परिसरातील खड्डे, अनियमित सुरू असलेल्या एसटी फेऱ्या व त्यामुळे विद्यार्थी, प्रवाशींची होत असलेली गैरसोय, मुलांचे मासिक पास या सर्व बाबींसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येथील आगारात धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. यावेळी एसटीचे अधिकारी पवार यांनी येत्या आठ दिवसांत खड्डे बुजविण्यासह सर्व समस्या मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले.
मनसेचे पदाधिकारी सावंतवाडी आगारातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यासाठी आज आगारात दाखल झाले. यावेळी अधिकाऱ्यांना विविध समस्यांबाबत जाब विचारण्यात आला. यावेळी अधिकारी पवार यांनी सोमवारपर्यंत समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले; मात्र सोमवारपर्यंत खड्डे न बुजवल्यास या ठिकाणी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत आंदोलन छेडू, असा इशारा उपस्थित मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आगार प्रमुखांना दिला. कंट्रोल रुमकडे चौकशीसाठी गेलेल्या प्रवासी व विद्यार्थ्यांबरोबर अरेरवीची भाषा करण्यात येत असल्याची तक्रार असून त्याबाबत योग्य ती समज संबंधितांना द्या; अन्यथा मनसे स्टाईलने समज देऊ, असाही इशारा मनसेकडून देण्यात आला. यावेळी माजी शहराध्यक्ष तथा मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, परिवहन कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, माजी उपशहराध्यक्ष प्रवीण गवस, माजी आरोस विभाग अध्यक्ष मंदार नाईक, मनविसे उपतालुकाध्यक्ष प्रणित तळकर, प्रशांत सावंत, योगेश घाडी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Final: वैभव सूर्यवंशीला स्वस्तात OUT केलं अन् सैम अयूबने केला विचित्र जल्लोष! VIDEO व्हायरल; भारतीय चाहते संतापले? नेमकं काय केलं?

Skybus : हवेतून धावणाऱ्या बसची गडकरींकडून पाहणी, शारजातील कंपनीला भेट; वाहतूक कोंडी कमी करण्याचा पर्याय

Pune-Kolad Road Accident : पुणे-कोलाड मार्गावर लवळे फाट्याजवळ भीषण अपघात; सिमेंटच्या ट्रकने कार-दुचाकींना उडवले, एकजण जागीच ठार, दोघे गंभीर

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवा ट्विस्ट! गोळी आरोपीलाही लागल्याची शक्यता, एसआयटीकडून पुरावे संकलित

SCROLL FOR NEXT