कोकण

दाभोळ ः 3 तत्कालीन मुख्याधिकारी यांच्याकडे चौकशी

CD

तत्कालीन तीन मुख्याधिकाऱ्यांकडे चौकशी
दापोली नगरपंचायत ; ५ कोटी ८१ लाखांचा अपहार
दाभोळ, ता. ३ ः दापोली नगरपंचायतीमध्ये झालेल्या अपहारप्रकरणी रत्नागिरी जिल्हा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने सखोल चौकशीला सुरवात केली असून या प्रकरणी ३ तत्कालीन मुख्याधिकारी यांच्याकडेही चौकशी करण्यात आली आहे. चौकशी अद्यापही सुरू आहे.
२०२१–२२ या आर्थिक वर्षात नगरपंचायतीच्या विविध बँक खात्यामधून ५ कोटी ८१ लाख १० हजार ३०९ इतक्या रकमेचा अपहार करण्यात आला होता. त्यापैकी १ कोटी ३० लाख ४९ हजार २०८ इतकी रक्कम पुन्हा खात्यात जमा करण्यात आल्याचे या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीला आढळून आले होते. त्यामुळे तत्कालीन लेखापाल दीपक सावंत याने ५ कोटी ८१ लाख १० हजार ३०९ इतक्या शासकीय निधीचा अपहार केल्याची तक्रार नगरपंचायतीचे लेखापाल सिद्धेश खामकर यांनी दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीनुसार सावंत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्याला अटकही करण्यात आली होती. सध्या सावंत यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.
याच प्रकरणात फैजान रखांगे यांच्या बँक खात्यात सावंत यांनी जवळपास दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वर्ग केल्याची कागदोपत्री माहिती पोलिसांना मिळाल्यावर आर्थिक गुन्हे विभागाने फैजान रखांगे याच्यावरही गुन्हा दाखल करून त्यालाही ९ एप्रिल २०२३ ला अटक केली होती. न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली आहे. या अपहारप्रकरणी जिल्हा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने मुंबई येथील एका लेखापरीक्षकाला (सीए) नगरपंचायतीच्या फॉरेन्सिक ऑडिटचे काम दिले असून सध्या तेही सुरू आहे. दापोली नगरपंचायतीचे तत्कालीन मुखाधिकारी महादेव रोडगे, देवानंद ढेकळे व प्रसाद शिंगटे, लेखापाल सिद्धेश खामकर यांच्याकडेही या प्रकरणाबाबत त्यांना दापोलीत बोलावून त्यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली आहे. या विभागाचे निरीक्षक परबलकर व त्याचे सहकारी सध्या दापोली येथे तपासासाठी तळ ठोकून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT