कोकण

कोकण रेल्वे

CD

धावत्‍या रेल्‍वेत सोने लुटणारी
आंतरराज्य टोळी जेरबंद

चार जणांना अटक; दीड कोटींचे सोने जप्‍त

मडगाव, ता. ३ : मुंबईहून केरळमध्‍ये रेल्‍वेतून सोने घेऊन जाणाऱ्या लोकांना हेरून ते झोपलेल्‍या अवस्‍थेत असताना या सोन्‍याची चोरी करून पळ काढणाऱ्या आंतरराज्‍य टोळीला कोकण रेल्‍वे पोलिसांनी जेरबंद केले आहे. या धाडसी कारवाईत चार संशयितांना अटक केली असून, त्यांच्याकडून दीड कोटींचे सोने जप्‍त केले आहे. या कामगिरीबद्दल कोकण रेल्‍वेचे पोलिस अधीक्षक गुरुदास गावडे यांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
अटक केलेल्‍या संशयितांमध्ये संदीप भोसले (४०, कवठेमहांकाळ, सांगली), अक्षय चिनवळ (२८, खानापूर-बेळगाव), अर्चना मोरे (३२, तळोजा-मुंबई) आणि धनपत बैद (४४, पूर्व परळ-मुंबई) यांचा समावेश असून, महाराष्‍ट्र व कर्नाटकात जाऊन ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, २ मे रोजी हमसफर सुपरफास्‍ट एक्‍स्प्रेस या ‍गाडीने मुंबईहून केरळमध्‍ये सोने घेऊन जाणाऱ्या अशोक आर. (५५, नागपाडा-मुंबई) यांना हेरून त्‍याच्‍याकडे सात किलो सोने असलेली सुटकेस पळवून सुमारे चार कोटींच्‍या ऐवजावर डल्‍ला मारला होता. यासाठी भोसले व चिनवळ या दोघांनी त्‍याचा पनवेलहून पाठलाग केला होता. पहाटे २.३० वाजण्‍याच्‍या सुमारास काणकोण (गोवा) येथे ही गाडी पोहोचल्‍यावर अशोक हे गाढ झोपेत असताना या दोघांनी सोन्‍याची बॅग चोरून क्रॉसिंगजवळ गाडी थांबलेली असताना ट्रेनमधून बाहेर उडी टाकून पळ काढला होता.
या संदर्भात सुरुवातीला पोलिसांना कुठलाही धागादोरा न सापडल्‍याने हा तपास रेंगाळला होता. मात्र, पोलिसांनी संपूर्ण रेल्‍वे मार्गाचा तपास केला, असता सांगली येथील दोन व्‍यक्‍तींचा या चोरीत हात असण्‍याची शक्‍यता त्‍यांना दिसून आली. उपअधीक्षक कदम आणि कोकण रेल्‍वे पोलिस स्‍थानकाचे निरीक्षक सुनील गुडलर यांनी सांगलीत जाऊन भोसले व चिनवळ या दोघांना अटक केल्‍यानंतर मुंबईत असलेल्‍या अन्‍य दोन त्‍यांच्‍या साथीदारांची त्‍यांना माहिती मिळाली. त्‍या दोघांना मुंबईत जाऊन अटक करून गोव्‍यात आणल्‍यावर त्‍यांना काणकोण न्‍यायालयासमोर हजर केले असता त्‍यांना चार दिवसांच्‍या पोलिस कोठडीचा रिमांड देण्‍यात आला आहे.
०००
अर्चनाने दिली टीप
पोलिसांकडून मिळालेल्‍या माहितीप्रमाणे, केरळातील सोनाराकडे अशोक हे सोने घेऊन जाणार असल्याची माहिती अर्चना मोरे हिला धनपत बैद याच्‍याकडून मिळाली होती. त्‍यानुसार अर्चनाने सांगलीतील आपल्‍या ओळखीचे असलेले अक्षय चिनवळ व संदीप भोसले यांच्‍याशी संपर्क साधला. १ मे रोजी सायंकाळी अशोक त्‍या सोनाराच्‍या दुकानातून सोने घेऊन निघाला होता. अक्षय व संदीप त्‍याच्‍या पाठोपाठ होते. तो ज्‍या गाडीत चढला त्‍याच्‍या मागोमाग तेही चढले आणि काणकोण येथे पोहोचल्‍यावर त्‍याच्‍याकडील सोने लुटले. पोलिसांनी अक्षय व संदीप यांना अटक केल्‍यानंतर त्‍यांनी अर्चनाने आपल्‍याला या कामगिरीवर पाठविले होते, अशी माहिती दिली. त्‍यानंतर अर्चनाला पकडले असता तिने धनपतचे नाव सांगितले. मिळालेल्‍या माहितीप्रमाणे, या चोरीतून अर्चनाला काही पैसे मिळाले होते. या पैशांतून ती मलेशियाच्‍या टूरला जाणार होती. धनपतही राजस्‍थानला जायच्‍या तयारीत होता. त्‍यापूर्वीच पोलिसांनी त्‍यांना अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT