कोकण

खेड-जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी

CD

- rat३p२७.jpg
13672
खेड ः पावसामुळे जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

रघुवीर घाटातील तलावात तरुण बुडाला

जिल्ह्यात पावसाचा पहिला बळी; जगबुडीच्या पातळीत वाढ

खेड, ता. ३ ः पावसाचा जोर वाढत असून पावसामुळे जगबुडी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. सातारा व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटातील शिंदी गावाजवळील पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या एका २४ वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला. जिल्ह्यातील हा पावसाचा पहिला बळी ठरला असून, रविवारी (ता. २) सायंकाळी ही घटना घडली.
ओमकार महेंद्र दहिवलकर (रा. खोपी फाटा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. ओमकार हा रविवारी सुटीनिमित्त पावसाळी पर्यटनासाठी आपल्या मित्रांसमवेत रघुवीर घाट येथे गेला होता. शिंदी गावाजवळ असलेल्या एका तलावात त्याला पोहण्याचा मोह आवरला नाही. त्याने तलावात उडी घेतली; मात्र तो बराच वेळ झाला तरी पाण्याच्या पृष्ठभागावर आला नाही. ही बाब त्याच्याबरोबर असलेल्यांनी पोलिसांना कळवली. पोलिसांनी सायंकाळी बचावकार्य सुरू केले. रात्री उशिरा त्याचा मृतदेह त्या तलावात आढळून आला. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या तलावात यापूर्वी अनेकांचा बुडून मृत्यू झाला आहे. यामुळे सद्यःस्थितीत रघुवीर घाट पर्यटकांना खुणावत असला, तरी धोका मात्र कायम आहे. जिल्ह्यातील पावसाचा हा पहिला बळी ठरला आहे.
दरम्यान, तालुक्यासह शहराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे जगबुडी व चोरद या नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. सोमवारी जगबुडी नदीने सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास इशारा पातळी ओलांडून धोक्याची पातळी गाठली. नदीपात्रातील पाणी ६.४० मीटरवर पोहोचल्याने प्रशासन सतर्क झाले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या आहेत.
०००

दापोलीत सर्वाधिक पाऊस
जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत ४८.३३ मिमी सरासरी पाऊस झाला. सर्वाधिक पावसाची दापोली तालुक्यात ९० मि.मी. नोंद झाली असून, त्यापाठोपाठ लांजा ६५, रत्नागिरी ६०, चिपळूण ५०, मंडणगड ३७, खेड ३२, संगमेश्वर ३४ आणि राजापूरमध्ये ४७ मि.मी. पाऊस झाला. सर्वांत कमी गुहागर तालुक्यात २० मि.मी. झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: इरफान पठाणने निवडली चेन्नई सुपर किंग्सची Playing XI: MS Dhoni संघाबाहेर, नव्या खेळाडूला दिली संधी

Investment Strategy: FD विसरा! कमी जोखमीमध्ये जास्त रिटर्न देणारे ‘हे 5’ जबरदस्त पर्याय पाहा

Chalisgaon News : गिरणा पट्ट्यात अवकाळीचा हाहाकार! तासाभराच्या गारपिटीने शेती पिके जमीनदोस्त; बळीराजा रडकुंडीला

अकोल्यातील वांगरगावात तणाव; शिवरायांचा पुतळा हटविण्याचा वाद; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा खरातचे 100पेक्षा जास्त व्हिडीओ असल्याची धक्कादायक बाब

SCROLL FOR NEXT