कोकण

दुचाकी चोरून पळणाऱ्यास पाठलाग करून पकडले

CD

दुचाकी चोरून पळणाऱ्यास
पाठलाग करून पकडले

सावंतवाडीत प्रकार; संशयितास कोठडी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ : येथील गवळी तिठा परिसरात उभी करून ठेवलेली दूध व्यावसायिकाची दुचाकी पळवून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याला दुचाकी मालकासह त्याच्या मित्राने पाठलाग करून येथील उपरलकर देवस्थानाकडे पकडले. ही घटना काल (ता. २) रात्री साडेनऊ वाजता घडली. प्रदीप मारुती धुमाळ (वय ३१, रा. आजरा-कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी दुचाकी मालक सर्फराज शेख (रा. जिमखाना) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले; मात्र संशयिताकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता असून, गेले काही दिवस सावंतवाडीत सुरू असलेल्या दुचाकी चोऱ्यांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेख हे शहरात दूध विक्रीचा व्यवसाय करतात. काल रात्री ते गवळी तिठा येथे राहणारे आपले मित्र शैलेश गवळी यांच्या घरी गेले होते. यावेळी त्यांनी रस्त्यावरच आपली दुचाकी लावली व गाडीलाच चावी ठेवली. हा प्रकार बाजूला उभ्या असलेल्या चोरट्याने पाहिला आणि त्याने गाडी सुरू करून आंबोलीच्या दिशेने पळ काढला. यावेळी घरात बसलेल्या शेख यांना आपली दुचाकी कोणीतरी घेऊन जात आहे याचा अंदाज आला. त्यांनी बाहेर येऊन त्यांनी पाहिले असता दुचाकी घेऊन संबंधित चोरटा आंबोलीच्या दिशेने जात असल्याचे दिसले. त्यावेळी त्यांनी तत्काळ मित्र गवळी यांच्या मदतीने त्याचा पाठलाग करत उपरलकर देवस्थानासमोर त्याला पकडले. पोलिसांना बोलावून त्यांच्या स्वाधीन केले, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार संशयित धुमाळ याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT