कोकण

पिंगुळीतील धोकादायक ''डीपी'' मनसेच्या दणक्यानंतर बदलली

CD

swt66.jpg
M14271
कुडाळः मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वीज अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

पिंगुळीतील धोकादायक ‘डीपी’
मनसेच्या दणक्यानंतर बदलली
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ः मनसे पदाधिकाऱ्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर महावितरण कंपनीला जाग येताच धुरीटेंबनगर येथील धोकादायक उघड्या अवस्थेतील ट्रान्सफॉर्मर डीपी तत्काळ बदलण्यात आली.
महावितरणच्या कारभाराबाबत सर्वत्रच संताप उमटत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर वारंवार होणाऱ्या विजेच्या लपंडावातून जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पिंगळी-धुरीटेंबनगर येथील ट्रान्सफॉर्मर डीपी गेले अनेक महिने उघड्या व धोकादायक अवस्थेत होती. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वारंवार डीपी बदलण्याच्या सूचना करून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर मनसे माजी कुडाळ उपतालुकाध्यक्ष दीपक गावडे, बाबल गावडे, वैभव धुरी, गजानन राऊळ, रविकिरण कविटकर, मांडकुली माजी सरपंच तातू मुळीक, मांडकुली उपसरपंच दिलीप निचम आदी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पाटील यांना जाब विचारत धारेवर धरले होते. त्यावेळी महावितरणकडून त्या जागी नवीन डीपी लावण्याचा शब्द देण्यात आला होता. अखेर सोमवारी (ता. ३) वीज कर्मचाऱ्यांनी धुरीटेंबनगर येथील ती धोकादायक अवस्थेत असणारी ट्रान्सफॉर्मर डीपी बदलण्यात आली. याबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : ठाकरे मेळाव्यावर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT