कोकण

जिल्हा नियोजन समिती सभेला अखेर मुहूर्त

CD

M14349

जिल्हा नियोजन समिती सभेला अखेर मुहूर्त
सोमवारी होणारः तब्बल सहा महिन्यानंतर आयोजन
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ६ः गेले अनेक महिने होऊ न शकलेल्या जिल्हा नियोजन मंडळाची सभा सोमवारी (ता.१०) दुपारी ४ वाजता जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात आयोजित केली आहे. यापूर्वी नियमित सभा ४ नोव्हेंबरला झाली होती. त्यानंतर ५ जानेवारीला ही सभा आयोजित केली होती. परंतु, त्यावेळी आचारसंहिता असल्याने केवळ २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे बजेट तयार करण्यासाठी प्रत्येक विभागाकडून मागणी घेतली होती.
जिल्हा नियोजन मंडळाची नियमित सभा ४ नोव्हेंबर झाली होती. तब्बल आठ महिने त्यानंतर सभा झाली नव्हती. त्यामुळे जिल्हा नियोजन सभा कधी लागणार? याबाबत विचारले जात होते. अखेर पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन मंडळ अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही सभा सोमवारी (ता. १०) दुपारी ४ वाजता आयोजित केली आहे. या सभेत जिल्ह्याच्या विकास कामांना मान्यता देण्यावर चर्चा होवून निर्णय घेतला जाणार आहे. ४ नोव्हेंबरनंतर ५ जानेवारीला ही सभा झाली होती. परंतु, त्यावेळी निवडणूक आचारसंहिता सुरू होती. त्यामुळे त्यावेळी विकासावर कोणतीही चर्चा किंवा निर्णय झाले नव्हते. केवळ २०२३-२४ चा विकास आराखडा तयार करण्यासाठी प्रत्येक विभागाकडून मागणी घेतली होती. त्यानंतर सहा महिने उलटले तरी जिल्हा नियोजन सभा झाली नव्हती. आता ही सभा होत आहे.
या सभेला केवळ आमदार आणि खासदार असणार आहेत. कारण जिल्हा परिषद व आठ पैकी तीन नगरपरिषदेवर प्रशासक कार्यरत आहेत. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीवर सदस्य नाहीत. अशासकीय सदस्य सुद्धा नियुक्त केलेले नाहीत. २०२२-२३ या वर्षासाठी एकूण १८२ कोटी रुपये खर्चाचा आराखडा मंजूर होता. तो खर्च १०० टक्के झाला असल्याचे जिल्हा नियोजन विभागाकडून सांगण्यात आले आहे. तर २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी २०० कोटी रुपये खर्चाचा आराखडा मंजूर आहे. मागील वर्षीच्या आराखड्यात १८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे या आराखड्यात असलेल्या कामांना सोमवारी होणाऱ्या सभेत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud : व्हॉट्सॲप लिंक, बनावट ईमेल व ‘डिजिटल अरेस्ट’च्या आमिषाने पुण्यात ४८ लाखांची सायबर फसवणूक

LSG vs RR Live: वैभव सूर्यवंशीची दुसरी धाव अन् ग्लेन मॅक्सवेल, पृथ्वी शॉचा यांचा मोठा विक्रम मोडला! दिग्वेश राठीने भन्नाट झेल टिपला Video

Latest Marathi News Live Update: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व चार आरोपींना मोठा दिलासा

Shirur Law & Order: : शिरूर तालुका नशामुक्तीसाठी तहसिलसमोर आठव्या दिवशीही सत्याग्रह; पोलिस प्रशासनावर निष्क्रियतेचे आरोप

Nilanga Crime : साडीने हातपाय बांधून तरुणाचा महिलेवर अत्याचार; माणुसकीला काळिमा फासणारी घटना, नराधम तरुण पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT