कोकण

‘वंदे भारत’चा अन्य गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

CD

‘वंदे भारत’मुळे अन्य गाड्या रखडतात
प्रवासी नाराज ; पर्यटनासाठी जाणार्‍या धनाढ्य प्रवाशांसाठीच
संगमेश्वर, ता. ६ : मुंबई-मडगाव या कोकण रेल्वे मार्गावर ‘वंदे भारत’ ही सुपरफास्ट गाडी सुरू करण्यात आली. या गाडीमुळे कोकणात जाणार्‍या अन्य गाड्यांचे वेळापत्रकावर परिणाम होत आहे. ‘वंदे भारत’ गाडीला मोजकेच थांबे दिले आहेत. या गाडीला पुढे जाण्यासाठी नियमित धावणाऱ्या गाड्या बाजूला थांबावण्यात येतात. परिणामी जनशताब्दी, नागपूर-मडगाव एक्स्प्रेस, तेजस एक्सप्रेस या गाड्या उशीराने धावत आहेत, अशी नाराजी संगमेश्वरचे संदेश जिमन यांनी व्यक्त केली.
संगमेश्वर तालुक्यातील १९६ गावांचा विचार केला तर हजारो प्रवासी नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसने प्रवास करू इच्छितात. त्यांच्या सुविधांचा आणि आपल्या वाढत्या उत्पन्नाचाही विचार प्रशासनाने केला पाहिजे. ‘वंदे भारत’ ही अति जलद गाडी असल्याने तिला कमी थांबे दिले आहेत. या गाडीमुळे इतर गाड्यांचा विलंब सर्वसामान्य प्रवाशाला सहन करावा लागत आहे. कोकण रेल्वे मार्गावर स्थानिकांसाठी जास्तीत जास्त गाड्यांचे नियोजन करावे अन्यथा आंदोलन केले जाईल, असे त्यांनी सांगितले. केवळ गोव्याला पर्यटनासाठी जाणार्‍या धनाढ्य प्रवाशांसाठीच ही गाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे, हे स्पष्टच आहे. या गाडीमुळे कोकणात जाणार्‍या इतर गाड्यांचे वेळापत्रक ढासळले आहेच शिवाय मोजकेच थांबे दिल्यामुळे इतर स्थानकांवर जाणार्‍या कोकणवासी प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. वंदे भारतसाठी वेगळा न्याय आणि संगमेश्वर स्थानकासाठी मात्र अन्याय, असा दुजाभाव न दाखवता सर्वांगीण सुविधेसाठी पावलं उचलावीत, असे आवाहन जिमन यांनी कोकण रेल्वेला केले आहे. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास प्रखर आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT