कोकण

गुहागर ः साखरीआगर येथील तरुणाचा बुडून मृत्यू

CD

साखरीआगर येथील तरुणाचा बुडून मृत्यू

पुन्हा तळ्यात उतरण्याचा मोह जीवावर
गुहागर, ता. ६ ः तालुक्यातील साखरीआगर येथील कातळवाडी येथे तळ्यात पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्योत उदय मेहता असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.
गुहागर तालुक्यातील कोंडकारूळ जागकरवाडी येथे राहणारा प्रज्योत हा २४ वर्षीय तरुण आपल्या चौघा मित्रांसोबत साखर आगार कातळवाडी येथील तळ्यावर सायंकाळी ४ वा.च्या दरम्यान पोहायला गेला होता. सुमारे दीड ते दोन तास सर्वांनी पोहण्याचा आनंद लुटला. त्यानंतर ते तळ्यातून बाहेर आले. थोड्या वेळाने त्यांना पुन्हा तळ्यात उतरण्याचा मोह झाला. या मोहानेच घात केला. एका बाजूला तिथे मित्र उभे असताना प्रज्योत याने दुसऱ्या बाजूने तळ्यात सूर मारला. बराच वेळ तो पाण्यातून वर येत नसल्याने इतर तिघांनी उड्या मारून त्याचा शोध घेतला. त्याला पाण्याबाहेर काढण्यात आले. पोटात गेलेले पाणी बाहेर काढूनही तो हालचाल करत नव्हता. अखेर एका खासगी वाहनाने मित्रांनी त्याला हेदवी येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे येथील डॉ. चंद्रकांत कदम यांनी सांगितले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी भा. दं. वि. कलम १७४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल तडवी, किशोर साळवी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

'दातापासून ते चेहऱ्याच्या हावभावापर्यंत; ‘दुआ तर अगदी रणवीरची कॉपीच’ नेटकऱ्यांनी रणवीरचे लहाणपणीचे फोटो काढले शोधून, Photo Viral

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

SCROLL FOR NEXT