कोकण

रत्नागिरीतील सावरकर नाट्यगृहाला गळती

CD

पान ३ साठी


१४४१३
सावरकर नाट्यगृहाला गळती
रंगमंच खराब होण्याची भिती; बादल्या लावण्याची आली वेळ
रत्नागिरी, ता. ६ः मुसळधार पावसाचा फटका पालिकेच्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहाला बसला आहे. पावसामुळे नाट्यगृहाच्या छताला गळती लागली असून, थेट रंगमंचावर पाणी पडत आहे. गळतीला कर्मचाऱ्यांना चक्क बादल्या लावायची वेळ आली आहे. याबाबत पालिका प्रशासनाला विचारणा केली असता त्यांनी गळतीबाबत इन्कार केला.
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहातील गैरसोयीबाबत अनेकवेळा चर्चा झाली आहे. कुचकामी वातानुकूलित यंत्रणेचा भांडाफोड अभिनेता भरत जाधव यांनी मे महिन्यात केली होती. त्यानंतर अनेक रंगकर्मी एकत्र येऊन या नाट्यगृहाच्या समस्येबाबत पालिकेला निवेदन दिले होते. त्यानंतर पालिकेने नाट्यगृहाच्या विंगा तसेच नाट्यगृहाचे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नावही नाट्यगृहाला झळकल्याने नाट्यगृहाबाबत येथील कलाकार-रंगकर्मीची नाराजी दूर झाली; मात्र पावसाळा सुरू होताच स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहातील गळतीच्या गंभीर प्रश्नाने डोके वर काढले आहे. दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नाट्यगृहाच्या छताला गळती लागली आहे. गळतीचे पाणी रंगमंचावर पडत आहे. रंगमंचाच्या उजव्या बाजूला पावसाचे पाणी ठिपकत आहे. गळती असलेल्या ठिकाणी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तीन बादल्या लावण्यात आल्या आहेत. या गळतीमुळे रंगमंच खराब होण्याची भिती निर्माण झाली आहे. याबाबत पालिका प्रशासनाला विचारणा केली असता त्यांनी गळतीबाबत नकार दिला. आम्ही कालच पाहणी केली होती. कुठे गळत नाही. तरी आम्ही माहिती घेऊन सांगतो, अशी उत्तरे देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: पिके करपली, दुष्काळाचे संकट गडद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एनडीआरएफची वाट पाहणार नाही, आधीच शेतकऱ्यांना मदत देणार

खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा दिलासा, 'तो' गुन्हा रद्द; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

NSE IPO: देशातील सर्वात मोठा IPO खुला! 14 हजारांच्या गुंतवणुकीवर किती फायदा? कधी होणार लिस्टिंग? जाणून घ्या सर्व

Bijli Tigress: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वाघीण 'बिजली'चा मृत्यू

Gauri Avahan 2026: गौराई घरात घेताना माप ओलांडणं का महत्त्वाचं? सांडलेल्या धान्याचंही आहे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT