कोकण

हातभट्टीविरोधी कारवाईत 6.5 लाखाचा मुद्देमाल जप्त

CD

फोटो rat६p४३३M१४४३८: खेड ः जप्त केलेली गावठी दारूचे कॅन

हातभट्टीविरोधी कारवाईत
साडे सहा लाखाचा मुद्देमाल जप्त
कुळवंडी, देऊळवाडी, खेड परिसरातील जंगलात कारवाई
खेड, ता. ६ : तालुक्यात गावठी हातभट्टी दारूविरोधात येथील पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली. कुळवंडी, देऊळवाडी, खेड आणि आजूबाजूला असणाऱ्या १ किमी जंगलमय व डोंगर भागांमध्ये केलेल्या कारवाईमध्ये धाडसत्र राबवून ६ लाख ६० हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार जणाना अटक केली आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मुनगेकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ५ जुलै रोजी सकाळी ७ वा. मौजे कुळवंडी, देऊळवाडी, खेड आणि आजूबाजूला असणाऱ्या १ किमी च्या जंगलमय व डोंगर भागांमध्ये ओढ्याजवळ असणाऱ्या हातभट्टी दारू धंद्यावर या पथकामार्फत धडक कारवाई करण्यात आली.
चौघांना वेगवेगळ्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच एका ठिकाणी हातभट्टी बेवारस असल्याचे आढळले. या कारवाईमध्ये मंगेश दगडू निकम, सुरेश निकम, संतोष जयराम निकम, अशोक लक्ष्मण निकम( सर्व राहणार खेड) यांच्याकडे व अन्य एका ठिकाणी बेवारस स्थितीत मिळून आलेल्या हातभट्टीसाठी लागणारा गूळ, नवसागर, हातभट्टी दारू, असा ६६०८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिस निरीक्षक नितीन भोयर व सहकाऱ्यांनी कारवाई केली.


त्या अपघातातील ट्रक चालकास जामिन
खेड : आसोंड अपघातामध्ये ८ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालक फरीद रहीस खान (वय २९ रा. राजस्थान) याची ५ जुलै रोजी जामीनवर मुक्तता केली. दापोली तालुक्यातील जोशी आळी येथील दापोली हर्णे रोडवर २५ जून ट्रकने समोर येणाऱ्या वाहनाला अति वेगाने धडक देवून झालेला अपघातात ९ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता व ७ प्रवाशांना गंभीर व किरकोळ स्वरूपाची दुःखापत झाली होती.या अपघातानंतर ट्रक चालक फरीद रहिस खान घटनास्थळावरून पळून गेला होता. या प्रकरणी चालक फरीद खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी दापोली न्यायालयात आरोपी याला हजर केली असता. त्याला ११ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी मध्ये ठेवण्यात आले. याप्रकरणी आरोपीच्या वतीने खेड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीची जामीनावर मुक्तता केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

'दातापासून ते चेहऱ्याच्या हावभावापर्यंत; ‘दुआ तर अगदी रणवीरची कॉपीच’ नेटकऱ्यांनी रणवीरचे लहाणपणीचे फोटो काढले शोधून, Photo Viral

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

SCROLL FOR NEXT