कोकण

आंबोली घाटीत मिळालेल्या मृताचे रेखाचित्र बनविणार

CD

आंबोली घाटीत मिळालेल्या
मृताचे रेखाचित्र बनविणार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ः आंबोली घाटातील अज्ञात मृताची ओळख पटविण्यासाठी येथील पोलिसांकडून त्याचे स्केच तयार केले जाणार आहे. हुबेहूब त्या व्यक्तीचे रेखाचित्र तयार करून सर्व पोलिस ठाण्यांना पाठविणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली.
आंबोली येथे दरीत आढळून आलेल्या अज्ञात व्यक्तीची ओळख पंधरा दिवस उलटत आले तरी पटलेली नाही. पोलिसांनी सर्व प्रकारे प्रयत्न करूनही ओळख पटविण्यात अपयश आले आहे. राखून ठेवलेला व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे. त्यावरून काही माहिती मिळते का, हे पोलिस पाहत आहेत. दरम्यान, लॅबचा अहवाल येईपर्यंत पोलिस अन्य मार्गांनी ओळख पटविण्याच्या प्रयत्नात आहेत. अनोळखी व्यक्तीचे वर्णन लक्षात घेऊन त्याचे रेखाचित्र तयार केले जाईल. ते सर्व पोलिस ठाण्यांना पाठवून सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. घाटात दरीत आढळून आलेल्या मृतदेहाच्या पेहेरावावरून तो घाटमाथ्यावरील कामगाराचा असल्याचे दिसत होते. असा पेहराव घाटमाथ्यावरील कामगारांमध्ये जास्त दिसून येतो. त्यामुळे हा मृतदेह घाटावरील कामगाराचा असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टीने तपास सुरू आहे. रेखाचित्र तयार करून काही धागेदोरे हाती लागतात का, यासाठी पोलिस प्रयत्नरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: जवखेडा ठोंबरे येथे शेतकरी संवाद सभा

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT