कोकण

पडेल माध्यमिक विद्यामंदिरला निरंजन दीक्षितांकडून 50 बेंच

CD

14793
पडेल ः येथील श्रीराम माध्यमिक विद्यामंदिरला निरंजन दीक्षित यांनी पन्नास बेंच देणगीदाखल दिले.

पडेल माध्यमिक विद्यामंदिरला
निरंजन दीक्षितांकडून ५० बेंच
देवगड, ता. ८ ः तालुक्यातील पडेल येथील श्रीराम माध्यमिक विद्यामंदिरला निरंजन दीक्षित यांनी सुमारे दोन लाख रुपये किमतीचे पन्नास बेंच देणगीदाखल दिले. आपले वडील नीळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांच्या स्मरणार्थ ही देणगी देण्यात आली. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कविता दीक्षित यांच्या हस्ते याचे औपचारिक उद्‍घाटन झाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून देवगड एज्युकेशन बोर्डाचे उपाध्यक्ष सदानंद पवार यांनी शाळेसाठी १० हजार रोख रक्कम देणगी स्वरूपात प्रदान केली.
बेंच प्रदान कार्यक्रम हायस्कूलमध्ये झाला. या उद्‌घाटन कार्यक्रमावेळी देणगीदार निरंजन दीक्षित, सदानंद पवार, कविता दीक्षित यांच्यासह देवगड एज्युकेशन बोर्डाचे कार्यवाह शंकर धुरी, नीळकंठ मराठे, सरपंच भूषण पोकळे, शाळा समिती सदस्य संजय घाडी, केंद्रप्रमुख अशोक जाधव, माजी सरपंच विकास दीक्षित, माजी सरपंच संजय मुळम, उपसरपंच विश्वनाथ पडेलकर, अभिजित ऐनापुरे, भूषण बोडस, अनंत पाटणकर, माजी मुख्याध्यापक बी. एन. पाटणकर, इंदिराकांत महांबरे, विनायक चव्हाण, भिकाजी धुमाळ, बबन पडेलकर, केशव मुळम, कृष्णा मेस्त्री, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष रमाकांत अनभवणे, सुरेश देवळेकर, रघुनाथ गोठणकर, तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापक हिराचंद तानवडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. रविराम माळगावे यांनी सूत्रसंचालन केले. संजीवनी फडके यांनी प्रास्ताविक केले. आनंद शेलटकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Recruitment : एमपीएससीच्या कारभारावर आक्षेपांचा पाऊस ; नागपूर विभागातून सर्वाधिक ७, ६०० ई-मेल ; व्ही. राधा यांची माहिती

Asian Games Nagoya : भारतीय खेळाडूंच्या आगमनात अडथळे ; आशियाई क्रीडा स्पर्धा ; खेळाडूंना क्रुझवरील रूम्स मिळण्यासाठी कसरत

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

SCROLL FOR NEXT