कोकण

कुडाळकर, तुम्हाला राष्ट्रवादीची कार्यपद्धती कधी समजलीच नाही

CD

14823
अनंत पिळणकर


कुडाळकर, तुम्हाला राष्ट्रवादीची
कार्यपद्धती कधी समजलीच नाही

अनंत पिळणकर; पदाला किती न्याय दिलात?

कणकवली, ता.९ : राष्‍ट्रवादी जिल्‍हाध्यक्ष अमित सामंत यांच्यावर टीका करणाऱ्या काका कुडाळकर यांनी आधी आपल्‍या राजकीय कारकीर्दीचा आढावा घ्यावा. तसेच राष्‍ट्रवादीचे प्रदेश सचिव म्‍हणून काम करताना आपल्‍या पदाला किती न्याय दिलात तेही पहावे, अशी टीका राष्‍ट्रवादीचे जिल्‍हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी आज केली.
काका कुडाळकर यांनी आज कुडाळ येथे पत्रकार परिषद घेऊन राष्‍ट्रवादी नेत्‍यांवर टीका केली होती. त्‍याला श्री.पिळणकर यांनी आज उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘कुडाळकर यांनी एका रात्रीत तीन पक्ष बदलले होते. त्‍यानंतर राष्‍ट्रवादीचे प्रदेश सचिव पद सांभाळूनही त्‍यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना आणि कार्यप्रणाली समजली नाही. आता अजित पवार गटात गेल्‍यानंतर राष्‍ट्रवादीचे जिल्‍हाध्यक्ष निष्क्रिय असल्‍याची टीका ते करत आहेत; पण तशी टीका करण्याचा अधिकार त्‍यांना नाही.’’
पिळणकर पुढे म्हणाले, ‘‘जिल्हाध्यक्ष सामंत यांनी काका कुडाळकर यांना जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय दौऱ्याची जबाबदारी दिली; पण ही जबाबदारी कुडाळकर पार पाडू शकले नाहीत. जो उद्देश बाळगून कुडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तो उद्देश साध्य झाला नाही म्हणून जिल्हाध्यक्ष निष्क्रिय असल्‍याची टीका ते करत आहेत. गेले वर्षभर कुडाळकर अस्वस्थ होते. त्‍यामुळे पक्ष फुटल्याची संधी साधून ते जिल्हाध्यक्ष पदाच्या अपेक्षेने अजित पवार गटात सामील झाले; पण पवार गटानेही त्‍यांना अध्यक्ष केले नाही तर अबिद नाईक यांची जिल्‍हाध्यक्षपदी नियुक्‍त केली. त्‍यामुळे कुडाळकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला; मात्र तेथेही त्‍यांना संधी मिळाली नाही, म्‍हणून आता ते मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असल्‍याचे सांगून जिल्‍हाध्यक्षांवर टीका करत आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT