कोकण

शिरगांवमध्ये घरावर झाड कोसळून नुकसान

CD

शिरगांवमध्ये घरावर झाड
कोसळून नुकसान
चिपळूण, ता. ८ः तालुक्यातील शिरगांव-सुतारवाडी येथे घरावर झाड कोसळून संजय शिवराम कोकिळकर यांचे नुकसान झाले आहे. माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच कोकिळकर कुटुंबाला मानसिक आधार देताना आर्थिक मदतीचा हात दिला.
शिरगाव-सुतारवाडी येथे विश्‍वकर्मा मंदिराजवळ संजय कोकिळकर हे वास्तव्याला आहेत. पावसात त्यांच्या घरावर वडाचे झाड पडून घराचे पूर्ण नुकसान झाले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. श्री. कोकीळकर व कुटुंबीयांना धीर देऊन मदतीचा हात दिला. तसेच शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती अनुदानच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. या वेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य शशिकांत चाळके, शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय मोरे, राजाभाऊ ताम्हणकर, उपसरपंच सोलकर, शेखर मेस्त्री, राजेंद्र माचकर, सुरेश पाचकले, प्रवीण गोवळकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मंत्रालयातच चोरी, मंत्र्याच्या कॅबिनमधून ८० हजार रुपये लंपास...

IPL 2026: हार्दिक पांड्या CSK कडून खेळणार? '०७:०७' पोस्ट अन् Mumbai Indians चा कॅप्टनची चर्चा... नेमकी भानगड काय?

Thane Crime: ‘प्रेम’ बनलं सापळा! १४० हून अधिक तरुणींची फसवणूक; ‘लव्ह स्कॅम’चा मास्टरमाइंड अटकेत

माझ्या नवऱ्यानेदेखील त्या बातम्या वाचल्या... मित्रांसोबत अफेअरच्या चर्चांवर पूजा सावंतने सोडलं मौन; म्हणाली-

Latest Marathi News Live Update : बाजारात इलेक्ट्रिक दुचाकीं खरेदीकडे नागरिकांचा कल

SCROLL FOR NEXT