कोकण

बस सुरू होताच आनंदी आनंद

CD

14865
आरोस ः येथे बस चालक व वाहक यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करताना विद्यार्थी.


बस सुरू होताच आनंदी आनंद

विद्यार्थ्यांना आधार; कनयाळ-शिरोडा-बांदा बसचे स्वागत


सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ८ ः आरोस येथील विद्याविकास हायस्कूल येथे कनयाळ-शिरोडा-बांदा बस आज दुपारी शाळा सुटण्याच्या वेळेत म्हणजेच सायंकाळी सुमारे ४.४० वाजता दाखल होताच चिमुकल्या विद्यार्थिनींनी बसचे चालक व वाहक यांचे गुलाबपुष्प देत स्वागत केले. या बसमुळे शाळेतील विद्यार्थिनींची तीन ते चार किलोमीटरची पायपीट थांबणार आहे.
आरोस येथील विद्याविकास हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना सायंकाळी परतीच्या प्रवासावेळी एसटी बस वेळेत उपलब्ध नसल्याने दररोज कोंडुरा तिठा ते मळेवाड अशी तीन ते चार किलोमीटर करावी लागणाऱ्या पायपीटीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हा कार्यकारिणीने वेंगुर्ले आगाराचे प्रमुख विशाल शेवाळे यांचे निवेदनातून लक्ष वेधले होते. या निवेदनावर तत्काळ कार्यवाही करताना ही यासाठी पुढाकार घेत प्रयत्न करणाऱ्या पत्रकार संरक्षण समिती, सिंधुदुर्गचे खाजिनदार मदन मुरकर यांचे व पत्रकार संरक्षण समिती सिंधुदुर्गच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे यावेळी आभार मानण्यात आले. यावेळी राज्य पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष प्रसाद मडगावकर यांनी फोनवरून पत्रकार संरक्षण समिती, सिंधुदुर्गच्या वतीने राज्य परिवहन महामंडळाचे वेंगुर्ले आगार स्थानक प्रमुख विशाल शेवाळे यांच्या कार्यतत्परतेबद्दल त्यांचे व वेंगुर्ले एसटी आगार सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाचे आभार व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT