कोकण

संस्कारमय पिढी घडवण्याचे श्रेय संस्थेला

CD

15147
कनेडी ः शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्धापनदिनाचे उद्‍घाटन करताना आमदार वैभव नाईक. शेजारी सतीश सावंत, तुकाराम रासम आदी.


संस्कारमय पिढी घडवण्याचे श्रेय संस्थेला

वैभव नाईक; कनेडी गट शिक्षण मंडळचा वर्धापनदिन उत्साहात

कनेडी,ता. १० ः ६७ वर्षांत ग्रामीण भागातील संस्कारमय पिढी घडवण्याचे श्रेय कनेडी शिक्षण संस्थेला जाते. यासाठी ज्यांनी त्याग केला आणि त्या काळात शिक्षण व्यवस्था निर्माण केली त्या जाणाकारांचे ऋण कायम स्मरणात राहतील, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी येथे केले.
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचा ६९वा वर्धापनदिन, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, नीती आयोग भारत सरकारद्वारा प्राप्त अटल टिंकरिंग लॅबचे उद्‍घाटन रविवारी (ता. ९) झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नाईक, सनदी लेखापाल तुकाराम रासम, संस्थाध्यक्ष सतीश सावंत, चेअरमन राजाराम सावंत आदी उपस्थितीत होते. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने झाली. त्यानंतर श्री. नाईक यांच्या हस्ते अटल टिंकरिंग लॅबचे उद्‍घाटन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये दहावी, बारावी परीक्षेमध्ये प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा, संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केलेल्या प्रशालेतील २ विद्यार्थ्यांचा आणि क्रीडा तसेच नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. माजी विद्यार्थी व प्रतिथयश व्यावसायिक बाळकृष्ण जगन्नाथ सावंत, शशांक मुकुंद बेळेकर, निलम कृष्णकांत कदम आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मंडळाचे उपाध्यक्ष पी. डी. सावंत, माजी जि. प. अध्यक्ष व संचालक संदेश उर्फ गोट्या सावंत, खजिनदार गणपत सावंत, सांगवे सरपंच संजय सावंत आदी उपस्थित होते. मंडळाचे सेक्रेटरी शिवाजी सावंत यांनी प्रास्ताविक केले. सहाय्यक शिक्षक प्रसाद मसुरकर व पल्लवी हाटले यांनी सूत्रसंचालन केले.
---
इतर मान्यवरांकडून मार्गदर्शन
यावेळी आमदार श्री. नाईक म्हणाले, ‘‘जीवनात यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षेची चांगली तयारी करा. जीवनात जे बनाल ते सर्वोत्तम बना, असा मौलिक संदेश दिला. या संस्थेला शाळा विकाससाठी ५ लाख आमदार निधीतून देऊ’’, अशी ग्वाहीही आमदारांनी दिली. ‘‘कितीही खडतर परिस्थिती समोर आली तरी डगमगून न जाता परिस्थितीवर मात करून यशस्वी व्हा,’’ असे मौलिक मार्गदर्शन तुकाराम रासम यांनी केले. ‘‘विद्यार्थ्यांनो, अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. आपल्याला लाभलेल्या उत्कृष्ट अध्यापकांकडून जास्तीत जास्त ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करा,’’ असे अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष श्री. सावंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avian Influenza: देशात एव्हीयन इन्फ्लूएंझा व्हायरसची एन्ट्री! चिकन आणि अंडी विक्रीवर बंदी; 'हे' नियम पाळले नाहीत तर मोठा धोका

Oppo Reno 15 Series Launch Date : तब्बल 200 मेगापिक्सेल कॅमेरा असणाऱ्या ‘Oppo Reno 15’ सीरीजची भारतातील ‘लाँच डेट’ जाहीर!

ती मला भेटायला का नाही आली? घराला कुलूप, अचानक झाली गायब; रजनीकांत यांचं ते प्रेम ज्याचा घाव आजही ताजा आहे

Pune Traffic Police : नववर्षाच्या रात्री पुण्यात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’वर धडक कारवाई; २०८ मद्यधुंद वाहनचालकांवर गुन्हे!

Government Decision on Gig Workers : ‘गिग वर्कर्स’बाबत सरकारचा मोठा निर्णय! ‘Social Security Cover’सह बरच काही मिळणार मात्र...

SCROLL FOR NEXT