कोकण

रत्नागिरी- सांधेदुखीने त्रस्त तरुणाला व्हीलचेअर प्रदान

CD

-rat१०p५.jpg- KOP२३M१५१५५ रत्नागिरी ः आरएचपी फाउंडेशनतर्फे जनार्दन ढेबे याला व्हीलचेअर प्रदान करण्यात आली.
--------------

सांधेदुखीने त्रस्त तरुणाला व्हीलचेअर प्रदान

वेरळ येथील दिव्यागाला आरएचपी फाउंडेशनमुळे जगण्याची मिळाली उमेद
रत्नागिरी, ता. १० ः वेरळ (ता. खेड) येथील २६ वर्षीय दिव्यांग जनार्दन बाबू ढेबे याला रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे (आरएचपी) व्हीलचेअर भेट देण्यात आली. गेली काही वर्षे तो बिछान्यावरच झोपून राहत होता. आता व्हीलचेअरमुळे सर्वत्र फिरू लागला आहे. त्याला आता जगण्याची नवी उमेद मिळाली आहे.
जनार्दन सांधेदुखी, गुडघेदुखीने ग्रस्त असून दोन्ही पायांनी दिव्यांग आहे. त्याला अजिबात चालता येत नाही. तो जन्मत: अगदी सुदृढ होता, अकरावीपर्यंत चांगले चालत होता; पण नंतर चालताना पाय दुखायला लागले आणि त्याचे दोन्ही पायांचे खुबे बाद झाले. दोन्ही गुडघे खराब झाले. शिक्षण थांबले आणि तो घरातच झोपून राहू लागला.
घरच्यांच्या मदतीशिवाय जनार्दन काहीच करू शकत नव्हते. त्यांच्या दोन्ही खुब्यांचे सांधे बदलण्याची शस्त्रक्रिया पुणे येथे झाली; पण फारसा फरक पडला नाही. दोन्ही गुडघे बदलण्याची शस्त्रक्रिया होणे बाकी आहे; पण कोरोनाच्या काळात त्याच्या आईचे निधन झाले. सध्या त्याचे वडील आणि आजोबा त्याला मदत करतात. त्याचा एक मोठा भाऊ मुंबईला कंपनीत नोकरी करतो तर दुसरा छोटा भाऊ महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. घरच्यांनी त्यांच्यासाठी एक व्हीलचेअर घेतली; पण ती त्याला ती सोयीस्कर झाली नाही. बसायला, चालवायला त्रास होत होता.
आरएचपी फाउंडेशनच्या खेडमधील सदस्य श्रद्धा आंब्रे यांच्याकडून जनार्दनला संस्थेबद्दल माहिती मिळाली. जनार्दनच्या वडिलांनी रत्नागिरीत आरएचपी फाउंडेशनच्या संस्थेत येऊन जनार्दनची पूर्ण माहिती सांगितली आणि नावनोंदणी केली. आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादीक नाकाडे यांनी संस्थेतर्फे जनार्दनला सोयीस्कर होणारी व्हीलचेअर दिली. त्यामुळे जनार्दनला कोणाच्या मदतीशिवाय बेडवरून उतरून व्हीलचेअरवर बसता येऊ लागले आहे. व्हीलचेअर चालवता येते त्यामुळे तो आता सर्वत्र फिरू लागला आहे. त्याचा आत्मविश्वास वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT