कोकण

रत्नागिरी ः जिल्ह्यात 211 दरडग्रस्त गावांवर विशेष लक्ष

CD

जिल्ह्यात २११ दरडग्रस्त गावांवर विशेष लक्ष

प्रशासन सज्ज ; अतिदुर्गम भागात विशेष सतर्कता
रत्नागिरी, ता. १० ः जिल्ह्यात गेल्या १८ वर्षांपासून पावसाळ्यात विविध नैसर्गिक आपत्तीची तीव्रता वाढत आहे. डोंगराळ भाग असल्याने काही ठिकाणी काही वर्षापासून दरड कोसळण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. आतापर्यंतच्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करता जिल्ह्यात संभाव्य दरडग्रस्त गावांमध्ये २११ गावांचा समावेश आहे. या गावांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
जिल्ह्यात भूस्खलनाचे प्रकार वाढले आहेत. दोन ते तीन वर्षांपू्र्वीही खेडमध्ये घरावर डोंगर कोसळून कुटुंबच्या कुटुंबे गाडली गेली होती. दिवसेंदिवस या नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढत आहे. त्यात चिपळूणला आलेल्या महापुरामुळे जिल्हा प्रशासन आणि शासनाला बरच काही शिकता आले. आता या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी गेल्या दोन वर्षांमध्ये विविध कार्यक्रम सुरू आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन आता नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाच्यादृष्टीने पूर्ण तयार झाले आहे. दरवर्षी पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) तुकड्या तैनात ठेवल्या जातात. या पावसाळ्यातही एनडीआरएफच्या तुकड्या जिल्ह्यातील आपत्ती निवारणासाठी तैनात राहणार आहेत. तशी तयार प्रशासनाने केली आहे.

चौकट
जिल्ह्यात ३०० आपदामित्रांची फळी

रत्नागिरी जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात ३०० आपदामित्र आणि सखी यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे संभाव्य आपत्तीमध्ये या आपदामित्रांकडून मदतकार्य होणार आहे. प्रशासनाने सुरक्षिततेच्यादृष्टीने दरडप्रवण भागातील नागरिकांनाही स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत.
--------------------
चौकट-
दरडग्रस्त गावांची तालुकानिहाय आकडेवारी-

मंडणगड - २
दापोली - २४
खेड - ५१
चिपळूण - ४८
गुहागर -१४
सगमेश्वर - ३९
रत्नागिरी -१७
लांजा - ११
राजापूर - ५
------------------
एकूण - २११
-------------
कोट
पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. गेल्या वर्षी परशुराम घाटात सातत्याने दरड कोसळण्याच्या घटना घडत होत्या. दोन दिवसांपूर्वीच या घाटाची पाहणी करून या विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. दरडग्रस्त गावांमध्ये सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
- एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT