कोकण

चिपळुणात मनसेची एक सही संतापाची मोहीम

CD

पान २ साठी
१५२३६

मनसेची एक सही
संतापाची मोहीम
चिपळूणमध्ये प्रारंभ; ग्रामस्थांनी दिला प्रतिसाद
चिपळूण, ता. १० ः एक सही संतापाची मनसेच्या या मोहिमेला मतदारांनी भरभरून प्रतिसाद देत आपला संताप व्यक्त केला. पक्षाच्या आदेशानुसार वाहतूक सेना रत्नागिरी जिल्ह्याच्यावतीने चिपळूण बहादूरशेखनाका येथे मोहीम राबवण्यात आली. या वेळी मतदारांनी प्रचंड प्रतिसाद देऊन आपला संताप व्यक्त केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, मनसेच्या विविध अंगीकृत संघटनांच्यावतीने एक सही संतापाची ही मोहीम राबवली जात आहे. राज्यात ज्यांना निवडून देण्यात आले आहे त्यांनी तर राजकारणाचा चिखल केला आहे. कोण कोणत्या पक्षात जाईल, हे सांगणे अवघड झाले आहे. चार वर्षात अनेकवेळा सत्ताबदल झाला आहे. मतदारांचा विश्वासघात केला जात आहे. मतदारांच्या मनातील संताप आता सह्याच्या रूपाने व्यक्त होऊ लागला आहे.
एकदा मतदान केले की, तुम्हाला गृहित धरणार? राजकारणाचा चिखल झाला आहे का? असे प्रश्न करत जर संताप होत असेल तर त्या संतापाची सही करून आपला संताप नोंदवा, अशा पद्धतीची मोहीम मनसे राज्यात राबवत आहे. बहादूरशेख नाका येथे रत्नागिरी जिल्हा वाहतूक सेनेच्यावतीने आज राबवण्यात आली. बहादूरशेख नाका येथे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेचा प्रारंभ केला. एक सही संतापाची या बोर्डवर आज दुपारपर्यंत दोनशे ते अडीचशे मतदारांनी सह्या करून आपला संताप व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार राबवण्यात आलेल्या या मोहिमेला बहादूरशेख येथे प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे.
वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले म्हणाले, ‘‘मला माझ्या दैवताचा अभिमान वाटत आहे. या चिखलात आमचा नेता आणि आमचा पक्ष नाही. सर्व पक्षांनी राजकारणाचे वाटोळे केले आहे. म्हणूनच एकवेळेला फक्त मनसेला सत्तेत बसवा. बघा, महाराष्ट्र राज्य कसे प्रगतीपथावर असेल. आता आपण मतदारांनी जागरूक होऊन मतदान केले पाहिजे अन्यथा हे असेच सुरू राहील. यासाठी मतदारांनी पुढाकार घेतला पाहिजे.’’
या वेळी प्रदीप संसारे, मंगेश महाडिक, राहुल शिंदे, संजय भोसले, संजय वाजे, प्रशांत हटकर, विठ्ठल दाते, रूपेश शेट्टे, निरंजय निर्मळ, मनोज कोलगे, गजानन राक्षे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adinath Maharaj: आदिनाथ महाराज नेमके कसे जखमी झाले? प्रत्यक्षदर्शी काय सांगतात? ९ वर्षांपूर्वी महाराज झाले होते बेपत्ता

हेल्मेट नसताना दुचाकी भरधाव वेगात पळवली; वाटेतच डंपरची धडक बसली अन्... तरुणाच्या डोक्याची झालेली दशा पाहून नागरिकांचं काळीज चिरलं

Trending News : रात्रभर बाईक चालू ठेवली; घरात विषारी धूर..एकाच कुटुंबात ४ व्यक्तींचा गुदमरून मृत्यू, राज्यभर खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण

Phaltan Politics: फलटणमध्ये सेटलमेंटचं राजकारण? भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा सभापती; रामराजेंचा गटही धक्कादायकरित्या सत्तेत..

महागडे LPG विसरा! भारताने शोधला नवा स्वयंपाकाचा गॅस; ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा प्रयोग, जाणून घ्या मोठी योजना...

SCROLL FOR NEXT