कोकण

सव्वा लाख विद्यार्थ्यांना गणवेशाबरोबर बूट, पायमोजेही

CD

गणवेशाचे चित्र घेणे....


सव्वा लाख विद्यार्थ्यांना गणवेशाबरोबर बूट, पायमोजेही

शासनाचे आदेश ; दारिद्रयरेषेवरील मुलांनाही मिळणार लाभ

रत्नागिरी, ता. १० ः नव्या शैक्षणिक वर्षांच्या प्रारंभी पात्र विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचा निर्णय झाला होता; मात्र दारिद्र्यरेषेवरील विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले होते. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी याबाबत शासनाने मोठा निर्णय घेताना आता उर्वरित सर्वच विद्यार्थ्यांनाही मोफत दोन गणवेश देण्याची तरतूद केली आहे. या वर्षीपासून सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देतानाच आता बूट आणि पायमोजेही मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याचा लाभ जिल्ह्यातील सव्वा लाख विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजनेतून शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातींची सर्व मुले आणि दारिद्रयरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येतो. जिल्ह्यातील ५१ हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जात आहे. मात्र दारिद्रयरेषेवरील पालकांच्या सुमारे ७५ हजार मुलांना मोफत गणवेशाचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनादेखील मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्याचा तसेच मोफत गणवेशांतर्गत सर्व पात्र विद्यार्थ्यांना एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे देण्याचा शासन विचार करत होते. त्यानुसार राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन मोफत गणवेश देण्यास मान्यता दिलेली आहे तसेच एक जोड बूट व दोन जोड पायमोजे देण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, शासनाच्या या निर्णयामुळे या वर्षीपासून एकही विद्यार्थी मोफत गणवेशापासून वंचित राहणार नाही. यातून सामाजिक दरीही दूर होणार असल्याने या निर्णयाचे पालकांमधूनही स्वागत करण्यात येत आहे.
--------------
चौकट
प्रति विद्यार्थी तरतूद
* दोन गणवेशासाठी ६०० रुपये एकूण ७५.६० कोटी
* बूट व पायमोज्यासाठी १७० रुपये एकूण ८२.९२ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smit Machar: ''तो' माझ्यावर वार करत होता, तरीही...'' कॅप्टन स्मित मछार यांनी सांगितला थरार; विमानावरील हल्ल्यानंतरचा व्हिडिओ समोर

Health Center in Darkness: नेत्यांसह प्रशासन झोपलंय का? लिहाखेडीत आरोग्य उपकेंद्रच अंधारात; प्रशासनाला जाग कधी? दोन वर्षांपासून वीजपुरवठा बंद

Latest Marathi News Live Update: पेन्शनधारकांच्या खात्यात महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेन्शन जमा

Navi Mumbai: नवी मुंबईकरांवर पाणीटंचाईचे संकट, मोरबेत ७३ टक्के पिण्यायोग्य साठा

हो, त्या सासू म्हणून खूप कडक... सून पूजा बिरारीचं सुचित्रा बांदेकरांबद्दल वक्तव्य;म्हणते, 'मी सगळ्यांना हेच सांगते की...

SCROLL FOR NEXT