कोकण

पुस्तक प्रकाशनाचा क्षण स्मरणीय बनवण्याचा प्रयत्न

CD

rat१०p३३.jpg -
२३M१५२७७
चिपळूण ःपुस्तक प्रकाशनाचा क्षण स्मरणीय बनवण्यासाठी पुस्तक वेगवेगळ्या आवरणात बनविण्यात आली. ती अर्थवाही होती.

४३ ( टुडे २ अॅंकर)

पुस्तक प्रकाशनाचा क्षण स्मरणीय बनवण्याचा प्रयत्न

विशाखा चितळे ; १२ पैकी अमूर्त विषयांवेळी लागला कस

चिपळूण, ता. ११ : पुस्तक प्रकाशनाचा सोहळा किती वेळ चालला तरी प्रत्यक्ष पुस्तक प्रकाशन काही क्षणात संपते. या सर्वात महत्त्वाच्या असलेल्या क्षणभंगूरतेचा शाप दूर करून तो स्मरणीय बनवण्याचा प्रयत्न येथे नुकत्याच पार पडलेल्या ऐतिहासिक १२ पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी करण्यात आला. त्याचे कौतुकही झाले. १२ विषयांपैकी प्रत्येक विषयावर महिलेने चारोळीत व्यक्त होऊन तयार झालेल्या या पुस्तकांचे प्रकाशन हा एक आनंददायी आणि सृजनशील निर्मितीचा आनंद देणारा क्षण होता, अशी प्रतिक्रिया विशाखा चितळे यांनी व्यक्त केली.
१२ पुस्तकांच्या प्रकाशनावेळी प्रत्येक पुस्तकावेळी वेगवेगळी संकल्पना कशी वापरली याबाबत या साऱ्यामागच्या सूत्रधार विशाखा चितळे यांनी सांगितले की, नातीगोती या विषयावरच्या ऋणानुबंध पुस्तकासाठी पूर्ण खोक्यावर मुखपृष्ठच हाताने चितारलं. प्रेम विषयावरच्या काळीज माया या पुस्तकासाठी बदामाच्या आकाराचे हृदय बनवून त्याच्या आत पुस्तक ठेवली. माणूस विषयावरच्या मुक्त चिंतन या पुस्तकासाठी माणसाची प्रतिकृती तयार करून त्याच्या अंतरंगात ठेवून पुस्तकांचं प्रकाशन केलं. भावभावना या विषयावरच्या भावतरंग पुस्तकासाठी सोशल मीडियात वापरले जाणारे हर तरेचे इमोजी खोक्यावर सजवून सर्व भावना व्यवस्थित दाखवता आल्या.मन या विषयावरच्या मनोनीत या पुस्तकासाठी समर्थ रामदास स्वामी, मनाचे श्लोक पुस्तक, सिग्मंड फ्राईड आणि मेंदू आणि हृदयात नेहमी अडकलेलं मन अशा सर्व प्रतीकांसह सजावट केली.
निसर्ग विषयावरच्या पुस्तकासाठी सजावटीसाठी केळीची पान सीतेची वेणी वापरलं. पाऊस विषय असलेल्या पुस्तकासाठी सध्या नामशेष होत चाललेलं इरलं फणसाच्या सुख्या पानांपासून बनवून त्यात पुस्तकं ठेवली होती. धरती विषयासाठी इथे जे जे आहे ते धरतीनेच दिलेल आहे अशा कल्पनेतून सुपारीच्या विरीची बनवलेली ताटली त्याच्यात नारळाच्या झापापासून चटई सारखं पाकीट तयार करून त्यात पुस्तके ठेवली होती. चंद्र चांदण्या सूर्यमाला विमान अवकाशयान आकाशगंगा पक्षी ही सर्व प्रतिक वापरून नभबोलीच्या खोक्याची सजावट केली. समुद्रासाठी शंख शिंपले मासे होड्या पाणवनस्पती शेषशायी विष्णू समुद्रमंथन अशी प्रतीक वापरली. देव अध्यात्मसाठी विंध्यवासिनीची प्रतिमा ठेवलेला गाभारा बनवून देवीच्या पायाशी पुस्तक ठेवली, असे त्यांनी सांगितले.
---
चौकट
षड् रिपु विषयासाठी प्रतीके

या बारा पुस्तकांच्या सजावटीच्या विषयानुरूप सर्व संकल्पना माझ्या स्वतःच्या असून त्यातल्या काही मी तर काही त्या त्या लेखिकेने तयार केल्या सांगताना विशाखा म्हणाल्या,षड् रिपु विषयासाठी सहा रिपुंचीची परमोच्च प्रतीक असतील असे फोटो सजावटीसाठी वापरले.जसं काम- मदन देव, क्रोध- भगवान शंकर, मोह -सीता, मद -रावण, लोभ -मिडास राजा आणि मत्सर- कैकयी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway: मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवर पावसाचा मोठा फटका! खालापूरजवळ पाणी साचल्याने दोन्ही दिशेची वाहतूक बंद; वाहनांच्या रांगा

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मानखुर्दमध्ये घर कोसळून 6 जणांचा मृत्यू; CM फडणवीसांनी मृतांच्या वारसांना जाहीर केली 5 लाखांची मदत

Pune Mumbai Train Update : लोणावळ्याजवळ मंकी हिल, ठाकूरवाडी घाटात दरड कोसळली; पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत, कोयना एक्सप्रेस तब्बल 3 तास उशिराने धावणार

Mexico vs England : चिडले, रडले, भांडले... तरीही हरले! मेक्सिकोची घरच्या मैदानावर हार, इंग्लंड रोमहर्षक विजयासह उपांत्यपूर्व फेरीत

पावसाचा हाहाकार! मिसिंग लिंकवर दरड कोसळली, 'मुंबई-पुणे एक्सप्रेस वे', मुंबई-गोवा महामार्गासह अनेक घाट रस्ते बंद

SCROLL FOR NEXT