कोकण

रिक्षा व्यावसायिकांचे प्रश्न सोडविणार

CD

१५२८२

रिक्षा व्यावसायिकांचे प्रश्न सोडविणार
दीपक केसरकर; सावंतवाडीतील कार्यक्रमात ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः रिक्षाचालक मालक संघटनेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करून त्यांना आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मितीही करण्याचे प्रयत्न असतील, असे प्रतिपादन स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी केले. कोरोना काळात मृत रिक्षाचालकांच्या कुटुंबीयांस आर्थिक मदत देण्याबाबत विचार करून निर्णय घेतला जाईल, तोपर्यंत माझे सहकार्य राहिल, असेही ते म्हणाले. तालुका रिक्षाचालक मालक संघटनेच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमास श्री. केसरकर यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. संघटनेच्या वतीने केसरकर यांचा सत्कार करण्यात केला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी सचिन कोलानी, सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षाचालक-मालक संघटनेचे सेक्रेटरी सुधीर पराडकर, सावंतवाडी तालुका संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र सावंत शामसुंदर नाईक, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण राणे, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, गजानन नाटेकर, आबा केसरकर, परशुराम चलवाडी, कांता कोडयाळ, विश्वास घाग आदी उपस्थित होते.
श्री. केसरकर म्हणाले, ‘‘कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा देताना ज्यांनी जीव गमावला, त्यांच्या कुटुंबीयासाठी शासन स्तरावरून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. संघटनेने अशी यादी तयार करून द्यावी. व्यक्तीगत म्हणून मदत करू. सावंतवाडीत रिक्षा स्टॅण्ड आहेत. परंतु, पावसाळा, उन्हाळ्याच्या कालावधीत रिक्षा मालक व चालकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्याशी चर्चा केली असून, त्यांनी पर्यायी व्यवस्थेसाठी परवानगी दिली आहे. लेखी परवानगी मिळेपर्यंत स्वखर्चातून आठवडा बाजारातील विक्रेत्यांना जशा छत्र्या दिल्या आहेत, तशा छत्र्या रिक्षांसाठी देण्यात येतील. फोल्ड मंडप लवकरच उपलब्ध करून दिला जाईल.’’
यावेळी जिल्हा रिक्षाचालक-मालक संघटनेचे सेक्रेटरी सुधीर पराडकर यांनी संघटनेच्या प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या आठ मागण्या सोडविण्यासाठी केसरकर यांनी शासनस्तरावर प्रयत्न करावे, अशी विनंती केली. यावेळी रिक्षाचालक-मालक संघटनेचे आवास शेख, राजन नवार, सुनील नाईक, संजय गावडे, सुनील तानावडे, प्रकाश कोकरे, रमेश जाधव, श्री. चेंदवणकर, सूर्यकांत वाडकर यांच्यासह सावंतवाडी, माजगाव, तळवडे, मळगाव अशा विविध रिक्षा स्टँडवरील चालक-मालक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT