कोकण

शिक्षक कामगिरीवर पाठविल्याने चिंदरमध्ये पालकांचे आंदोलन

CD

15303
चिंदर ः शाळा मुलांविना सुनी सुनी झाली आहे.

शिक्षक कामगिरीवर पाठविल्याने
चिंदरमध्ये पालकांचे आंदोलन
आचरा, ता. १० ः जिल्हा परिषद केंद्रशाळा चिंदर या सातवीपर्यंतच्या शाळेतील तीन शिक्षकांपैकी कामगिरीवर पाठविलेला शिक्षक जोपर्यंत पुन्हा शाळेत कार्यरत होत नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला. त्यामुळे चिंदर केंद्रशाळा शनिवारपासून मुलांविना सुरू आहे.
एकवीस पटसंख्या असलेल्या चिंदर केंद्रशाळेस चार शिक्षक मंजूर आहेत; मात्र सध्या या शाळेत केवळ मुख्याध्यापक आणि दोन शिक्षक मिळून तीनच शिक्षक सातवीपर्यंतची शाळा चालवत आहेत. यातच मागील आठवड्यात एक शिक्षक दुसऱ्या शाळेवर कामगिरीसाठी काढल्याने पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. याचा निषेध करत पालकांनी आंदोलन पुकारले आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रणजित दत्तदास म्हणाले, ‘‘कोणतीही पूर्वकल्पना न देता शाळेच्या शिक्षकाला दुसऱ्या शाळेत कामगिरीवर पाठवल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गेल्या वर्षीही एक शिक्षक कामगिरीवर काढण्यात आला होता. त्यावेळी आम्ही सहन केले; मात्र दरवेळी आमच्या मुलांवर अन्याय सहन करणार नाही. शिक्षक परत शाळेत कार्यरत होत नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: नव्या पर्वाची सुरुवात पण स्मृती मंधाना आणि झिम्बाब्वेच्या खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानावर का उतरले? नेमकं काय घडलं?"

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: शहरात १०% पाणीकपात, तरीही टँकरने धुतले BRT चे डिव्हायडर; नागरिकांमधून संताप

SCROLL FOR NEXT