कोकण

वर्षा पर्यटनहून परतणाऱ्यांवर मधमाशांनी केला हल्ला

CD

पान एक

वर्षा पर्यटकांवर
मधमाश्‍यांकडून हल्ला
मांगेलीजवळील घटना ः दोघे गंभीर
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १० ः मांगेली येथे वर्षा पर्यटनाचा मनोसोक्त आनंद लुटून सायंकाळी घरी परतणाऱ्या बेळगाव येथील पर्यटकांवर मधमाश्‍यांनी हल्ला केला. त्यात दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर बेळगाव येथे केएलई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी (ता.९) सायंकाळी उशिरा मांगेली व कर्नाटक सीमेवरील सडा खिंड येथे घडली. यात रमेश दोड्डामणी (वय २५) व संजय बेळकुंदरीकर (वय २६) हे दोघे गंभीर झाले, तर अन्य चार जण किरकोळ जखमी झाल्याचे समजते.
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला तालुक्यातील मांगेली धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळत आहे. त्यामुळे या धबधब्याच्या पाण्यात वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी जिल्ह्यातील व गोवा, कर्नाटक राज्यांतील पर्यटक तुफान गर्दी करीत आहेत. रविवारी मांगेलीच्या वर्षापर्यंटनाचा आनंद लुटण्यासाठी शेकडोंच्या संख्येने पर्यटकांनी मांगेलीत उपस्थिती लावली होती. शेजारील कर्नाटक राज्यातील बेळगाव येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या सात तरुणांचा एक ग्रुप मांगेलीत धबधब्यावर आला होता. दिवसभर मौज-मस्ती करून वर्षापर्यटनाचा आंनद लुटून ते सडामार्गे चोरल्याच्या रस्त्याने घरी जाण्यास निघाले. मांगेलीची सीमा जिथे संपते व कर्नाटक सीमा सुरू होते, असे एक ठिकाण जे सडा खिंड म्हणून परिचित आहे. त्या ठिकाणी ते थांबले व त्यातील दोघे जण लघुशंकेसाठी गाडीतून खाली उतरले. त्यातील एकाने खिंडीवरून सहजच खाली दगड फेकला. नेमकाच तो दगड मधमाश्‍यांच्या पोळ्यावर जाऊन बसला. परिणामी डीवचलेल्या मधमाश्‍यांनी त्या युवकांना कळायच्या आतच हल्ला चढविला. त्यांना त्या हल्ल्यातून वाचविण्यासाठी अन्य चार युवक गाडीतील प्लास्टिक कापड घेऊन उतरले. त्या दोघांना वाचविण्यासाठी उतरलेल्या चौघांवरही मधमाश्यांनी हल्ला केला. गंभीर झालेल्या त्या दोघांना प्लास्टिकच्या आधारे गाडीत घालून इतर सहकाऱ्यांनी कसेबसे उपचारासाठी थेट बेळगावच्या केएलई रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Filing Deadline: उद्यापासून 5,000 दंड; ITR भरण्याचा आज शेवटचा दिवस, 5 मिनिटांत स्वतः फाईल करा

Gold Rate Today : सोने पुन्हा स्वस्त, चांदीचाही भाव कमी, खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Sangli IT Bogus Raid : I Am From Income Tax म्हणत मध्यरात्री छापा, डॉक्टरला दीड किलो सोनं अन् १५ लाखांना चुना लावला...

भारतीयांमध्ये खेळाडूवृत्ती नाही...! शाहिद आफ्रिदीने 'Handshake' प्रकरणावर सूर्यकुमार यादव, BCCI ला सुनावले

Jalna Flood: शहरात पावसाचा हाहाकर सीना कुंडलिका नदीला पूर; शहरातील सखल भागात साचले पाणी

SCROLL FOR NEXT