कोकण

फोटोग्राफी मार्गदर्शन सत्रास कुडाळात उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

swt118.jpg
15402
कुडाळः विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविताना मान्यवर.

फोटोग्राफी मार्गदर्शन सत्रास
कुडाळात उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले फोटोग्राफी स्कूल असलेल्या भूषण जडये स्कूल ऑफ फोटोग्राफीतर्फे ''फोटोग्राफीमधील उपलब्ध करिअर संधी'' या विषयावर आयोजित मार्गदर्शन सत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून जाहिरात क्षेत्रातील २८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारे राजा हळदणकर यांना आमंत्रित केले होते.
यावेळी हळदणकर मुलांना मार्गदर्शन करताना फोटोग्राफीच्या ३२ वेगवेगळ्या शाखांविषयी माहिती दिली. फोटोग्राफी क्षेत्रामध्ये प्रचंड संधी आहेत. वेडिंग फोटोग्राफीपुरतेच मर्यादित न राहता इतर प्रकारांविषयी विद्यार्थ्यांनी माहिती मिळवावी, असे आवाहन त्यांनी केले. हे करत असतानाच त्या क्षेत्रातील मान्यवरांचे काम सतत अभ्यासत राहा, असा सल्लाही त्यांनी दिला.
या सत्रामध्ये प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुपेश धुरी यांनीही आपला फोटोग्राफीचा प्रवास उलगडून दाखवला. आपल्या आवडीचे व्यवसायामध्ये रुपांतर करण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे, या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी भूषण जडये स्कूल ऑफ फोटोग्राफीच्या दुसऱ्या बॅचच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली. मार्गदर्शन सत्राला विद्यार्थी आणि पालकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा ! शेतकऱ्याची जमीन हडपली, पोलिसांकडे तक्रार करताच सुपारी देऊन हत्या

Gopikishan Bajoria: पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे: माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया; चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश!

Numerology : 'या' 3 मूलांकाच्या मुली असतात सर्वांत जास्त साध्याभोळ्या; साक्षात लक्ष्मीचे रूप बनून बदलतात जोडीदाराचे आयुष्य

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये अशोक खरातचा पीए रमेश हिंगे फरार, SIT कडून शोधमोहीम सुरू

Pune Magarpatta Canal Burst : मगरपट्टा परिसरात कालवा फुटला; 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' पर्यायी मार्ग नक्की पाहून घ्या...

SCROLL FOR NEXT