कोकण

बीएसएनएल नेटवर्क प्रश्नाबाबत मळगावात आंदोलनाचा इशारा

CD

बीएसएनएल नेटवर्क प्रश्नाबाबत
मळगावात आंदोलनाचा इशारा

सावंतवाडी, ता. ११ ः मळगाव (ता.सावंतवाडी) पंचक्रोशीत काही दिवसांपासून बीएसएनएल नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत संपर्क साधूनही अधिकारी हातावर हात ठेवून आपले काम करत असल्याचा आरोप करीत नेटवर्क त्वरित उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेचे स्थानिक पदाधिकारी सुधीर राऊळ यांनी दिला आहे.
सिंधुदुर्गातील डोंगरपट्टीतल्या गावांतील एकूण १२५ बीएसएनएल टॉवर बंद आहेत. त्यामुळे परिसरातील ग्राहक त्रस्त असून त्यांचा बाहेरील लोकांशी संपर्क तुटत आहे. स्थानिक खासदार, आमदार हे लोकांच्या समस्या बघून काम करत नाहीत, तर लोकांना गृहित धरून आपले सोईस्कर राजकारण करतात, तर अधिकारी आपला पगार घेऊन मस्त आहेत, असा आरोपही राऊळ यांनी केला आहे. टॉवर बंद असल्याने मोबाईल नेटवर्क मिळत नाही. यामुळे मुलांच्या ऑनलाईन अभ्यासाचेही नुकसान होत असून ग्राहकांचे त्या दिवसांच्या रिचार्जचे पैसे फुकट जातात. त्यामुळे ग्राहकांची लुबाडणूकच सुरू आहे, असेही राऊळ यांनी म्हटले आहे. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन नेटवर्क उपलब्ध करून द्यावे; अन्यथा स्थानिक ग्राहकांना घेऊन बीएसएनएलच्या कार्यालयावर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राऊळ यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gaikwad Reaction : शेतकरी संकटात अन् मंत्री फुलांवरून चालले; संजय गायकवाडांचा शिरसाटांना घरचा आहेर

Sangli Water Restriction:धरणे तुडुंब भरलेली असताना उपसाबंदी कशासाठी? राजू शेट्टींचा शासनावर हल्लाबोल : सांगली-कोल्हापुरात पहिल्यांदाच निर्णय

Thailand Ganeshotsav : ढोल-ताशांचा गजर, भक्तिगीते अन् गणेश विसर्जन मिरवणूक; बँकॉकमध्ये रंगला गणेशोत्सव

Marathi News Live Updates : बदलापुरात बसची दुचाकीला धडक दुचाकीवरील तरुणीचा मृत्यू, तरुण गंभीर जखमी

लालबागच्या राजाच्या चरणांचं कुंकू पत्नीच्या भांगेत भरलं अन्...; संजय दत्तचा Viral Video, नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT