कोकण

चिंदरमध्ये पशुवैद्यकीय यंत्रणा कार्यरत

CD

लोगो ः जनावरे मृत्यू प्रकरण
---
15465
चिंदर ः येथे पशु वैद्यकीय अधिक्षक, लोकप्रतिनिधी व भाजप पदाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन पाहणी करत आढावा घेतला. (छायाचित्र ः अर्जुन बापर्डेकर)


पशुवैद्यकीय यंत्रणेचे चिंदरमध्ये ठाण

स्थिती नियंत्रणात; शेतकऱ्यांच्या घरी जाऊन आढावा

सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ११ ः चिंदर (ता.मालवण) गावात अज्ञात आजाराने तीन दिवसात ३१ शेतकऱ्यांची ४१ गुरे दगावली आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा पशु वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्यानंद देसाई यांनी आज गावात सुरू असलेल्या आरोग्य उपाययोजनांचा शेतकऱ्यांच्या घरी जाऊन आढावा घेतला. शेतकऱ्यांनी घाबरू नये. पशुवैद्यकीय यंत्रणा २४ तास कार्यरत असून उपाययोजना सुरू असून स्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
चिंदर गावात तीन दिवसांपासून अज्ञात आजाराने ४१ जनावरे दगावली आहेत. ऐन शेतीच्या हंगामात ही घटना घडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आहे. पशुवैद्यकीय विभाग प्रशासकीय यंत्रणा चिंदर गावात ठाण मांडून आहे. आज जिल्हा पशुवैद्यकीय अधीक्षक डॉ. देसाई यांनी गावात सुरू असलेल्या आरोग्य उपाययोजनांचा शेतकऱ्यांच्या घरी जाऊन आढावा घेतला. पशुवैद्यकीय यंत्रणा २४ तास कार्यरत असून उपाययोजना सुरू आहेत. स्थिती नियंत्रणात आहे, असे आवाहन त्यांनी केले. सद्यस्थितीत गुरांचे लसीकरण, अन्य औषधोपचार करण्यात येत आहेत. काही ठिकाणी ज्या जनावरांना लक्षणे जाणवत होती ती औषध उपचाराअंती बरी होत आहेत. याबाबत अहवाल प्राप्त होण्याची प्रतीक्षा असली तरी प्रशासकीय यंत्रणा तसेच ग्रामपंचायत सतर्क आहे, असेही श्री. देसाई म्हणाले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, माजी सभापती धोंडी चिंदरकर, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, चिंदर प्रभारी सरपंच दीपक सुर्वे, मंगेश गावकर, संतोष गावकर, पशुधन विकास अधिकारी डॉ. सतीश राऊत यासह अन्य आरोग्य पथक उपस्थित होते.
---------
चौकट
मदतीचे आश्वासन
तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांना याबाबत माहिती दिली. पालकमंत्री यांनी तात्काळ प्रत्येक शेतकऱ्याला आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. माजी खासदार राणे यांनीही शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देणार असल्याचे सांगितले आहे. ऐन शेती हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नसल्याचे, त्यांनी सांगितले असल्याची माहिती श्री. चिंदरकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

Latest Marathi News Live Update : ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये उभाणार ‘स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र’

SCROLL FOR NEXT