कोकण

खेडमध्ये ''घड्याळा''ची गती मंदावणार

CD

३४ (पान २ साठी)

खेडमध्ये ''घड्याळा''ची गती मंदावणार?

जिल्हाध्यक्षांची भूमिका गुलदस्त्यात ; शिवसेना-राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष टीपेला


खेड, ता. ११ ः चार महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी स्वगृही परतत ठाकरे गटाच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. या पक्षप्रवेशामुळे तालुक्यात राष्ट्रवादी खिळखिळी झालेली असतानाच त्यात आता अजित पवारांच्या बंडाची भर पडल्याने घड्याळाची गती आणखीनच मंदावणार आहे. या बंडामुळे विचित्र स्थिती निर्माण झाली असून, शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव नेमकी कोणती भूमिका घेतात? यावरच राष्ट्रवादीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. माजी आमदार संजय कदम यांच्यामुळे राष्ट्रवादीची ताकद कमालीची वाढली होती. शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला यापूर्वी त्यांनीच सुरूंग लावत राष्ट्रवादीला सुगीचे दिवस प्राप्त करून दिले होते. वर्षभरापूर्वी घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर तीनच महिन्यापूर्वी माजी आमदार संजय कदम ठाकरे गटाच्या शिवसेनेत डेरेदाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला छेद मिळाला.
तालुक्यात शिवसेना नेते रामदास कदम व आमदार योगेश कदम यांची पकड कायम असून, तालुक्यातील शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या देखील वाढतच असल्याने शिवसेना जोमातच आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेला शह देण्याचाही तितकाच प्रयत्न केला जात असल्याने राजकीय संघर्ष टीपेला पोहचला आहे. अजित पवार यांच्या बंडामुळे आता नवी समीकरणे उदयास येणार असल्याने राजकीय वातावरणदेखील ढवळून निघणार आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी अजूनही ठोस भूमिका स्पष्ट केलेली नाही. राष्ट्रवादीच्यात संभ्रमावस्थाच निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US Ceasefire : अमेरिका-इराणमध्ये शस्त्रसंधीची घोषणा होताच कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

Gold Rate Today: युद्ध थांबल्याने सोन्याचे भावात अचानक मोठा बदल! काय आहे आजचा ताजा भाव?

Aachara Agitation : तळाशील वाचवा, कोकण वाचवा! खाडीत उतरून महिलांचं आंदोलन, महिलेची प्रकृती बिघडली

Latest Marathi News Live Update: वर्क फ्रॉम होमच्या आमिषाने 17 लाखांची फसवणूक; एक आरोपी अटकेत

Video Viral : शार्दूल ठाकूरने बाद करताच वैभव सूर्यवंशी ढसाढसा रडला; तो फटका का खेळला? स्वतःवरच चिडला

SCROLL FOR NEXT