कोकण

रत्नागिरी-मिर्‍याच्या ग्रोयन बंधाऱ्याचे काम पुन्हा सुरू

CD

मिऱ्या‍च्या ग्रोयन बंधाऱ्याचे काम पुन्हा सुरू
रत्नागिरी, ता. ११ ः पावसाळा नियमित सुरू झाल्याने मिर्‍या धूपप्रतिबंधक बंधार्‍याचा जुना बंधारा काढून तेथे नवीन बंधार्‍याचे काम धोकादायक असते. त्यामुळे जो नवीन बंधारा झाला आहे त्या ठिकाणी टेट्रापॉडस् टाकले जात असून, आधुननिक ग्रोयन पद्धतीने काम केले जात आहे. पावसामुळे गेले काही दिवस कामाचा वेग मंदावला होता; परंतु, आता पावसाची विश्रांती आणि ऊन असल्याने पुन्हा त्या कामाने वेग घेतला आहे.
शहरालगतच्या मिऱ्या‍ येथील समुद्रात टेट्रापॉडस् व ग्रोयनचा धूपप्रतिबंधक बंधारा बांधला जात आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यापासून प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. सुमारे १९२ कोटी रुपये खर्चाचा हा बंधारा एकूण ३४०० मीटरचा आहे. पाऊस नियमित सुरू होईपर्यंत त्यातील १६०० मीटरच्या बंधाऱ्‍याचे काम पूर्ण झाले आहे. पुढील बंधारा बांधण्यासाठी जुन्या बंधाऱ्‍याचे दगड काढावे लागतात. पावसाळ्यात मिऱ्‍या समुद्रात उधाणाच्या मोठमोठ्या लाटा उसळतात. जुना बंधारा उघडल्यास उधाणांच्या लाटांमुळे समुद्राचे पाणी गावातील घरापर्यंत जाण्याची भीती असते. त्यामुळे जो १६०० मीटरचा बंधारा पूर्ण झाला आहे त्याला पूरक असलेले टेट्रापॉडस् टाकण्याचे ग्रोयन पद्धतीचे काम केले जात आहे. हे कामसुद्धा भरती-ओहोटीसह उधाणाचा अंदाज घेऊन करावे लागते. त्यामुळे ओहोटीच्या वेळेतच हे काम वेगाने होते. त्यानुसार टेट्रापॉडस् टाकण्याचे आणि बंधार्‍याच्या पृष्ठभागावर ग्रोयन पद्धतीचे काम करून घेतले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

SCROLL FOR NEXT