कोकण

‘ते’ आमदार मनाने शरद पवारांसोबत ः आव्हाड

CD

‘ते’ आमदार मनाने शरद
पवारांसोबत ः आव्हाड

ईडीची भीती दाखवून पळवले

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ११ ः राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत ४० आमदार हे आजही मनापासून आहेत. त्यांना केवळ ईडीची भीती दाखवून भाजपने पळविले आहे. आता आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. त्यामुळे लढणार तर नक्कीच, असे विधान करत जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बोलून लवकरच पुढील रणनीती ठरविणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी बांद्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
प्रदेशाध्यक्ष आव्हाड यांचे बांद्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. यावेळी आव्हाड यांचे राष्ट्रवादीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रवादीच्या कोकण महिला विभाग अध्यक्षा अर्चना घारे परब, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, महिला जिल्हाध्यक्ष अॅड. रेवती राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आव्हाड हे प्रथमच जिल्ह्यातील निष्ठावान कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आज जिल्ह्यात दाखल झालेत. यावेळी त्यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषी स्वागत केले. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सौ. दर्शना बाबर देसाई, आसिफ शेख, प्रशांत पांगम, समीर सातार्डेकर, वैभव परब यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh: परदेशात नोकरीला जाण्यापूर्वी युपीचे तरुण शिकणार तिथली भाषा! योगी सरकारचा मोठा निर्णय

Ayodhya Ram Mandir: इस्रोच्या मदतीने रामललाचा अलौकिक 'सूर्याभिषेक'! ४ मिनिटे कपाळावर चमकली सूर्याची किरणे

Meta Brain : माणसाचा मेंदू कॉपी करत आहे Meta! बनवला 'डिजिटल ब्रेन'; जो पाहू अन् ऐकू शकतो, आता मशीन समजून घेणार तुमच्या भावना

Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

SCROLL FOR NEXT