कोकण

दाभोळ-उसगाव सरपंच, सदस्यांचे उपोषण स्थगित

CD

उसगाव सरपंच, सदस्यांचे उपोषण स्थगित
ग्रामनिधीची रक्कम परस्पर पाठवली ; बॅंकेचे लेखी आश्वासन
दाभोळ, ता. ११ ः दापोली तालुक्यातील उसगाव ग्रामपंचायतीच्या बँक ऑफ इंडिया शाखा दाभोळ येथील ग्रामनिधी खात्यात जमा केलेली रक्कम ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय बँकेने कंपनीला परस्पर परत पाठवली होती. त्यामुळे सदर रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात पुन्हा जमा करण्यात यावी, या मागणीसाठी उसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांनी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात सुरू केलेले उपोषण सोमवारी (ता. १०) रात्री बॅंकेतर्फे देण्यात आलेल्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.
उसगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील भारती डीफेन्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने थकित इमारत करापोटी उसगाव ग्रामपंचायतीच्या बँक ऑफ इंडिया दाभोळ शाखेतील ग्रामनिधी खात्यात ६४ लाख ४७ हजार ८८० इतकी रक्कम ३१ मार्च २०२३ ला एनइएफटीद्वारे वर्ग केली होती. ही रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा झाल्यावर कंपनी प्रशासनाने सदर रक्कम आम्ही चुकून तुमच्या खात्यात वर्ग केली असल्याने ती परत द्या, अशी मागणी ग्रामपंचायतीकडे केली; मात्र कंपनीकडून सदर रक्कम थकित करापोटी येणे असल्याने ग्रामपंचायतीने कंपनीला रक्कम परत दिली नाही. ग्रामपंचायतीची फसवणूक झाली असून बँकेकडून न्याय मिळत नसल्याने सरपंच व सदस्य यांनी पंचायत समिती दापोलीच्या आवारात काल उपोषणाला सुरवात केली होती. या उपोषणाची दखल घेऊन बँक ऑफ बडोदा व बँक ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बँक ऑफ बडोदाला जी रक्कम परत पाठवली आहे, ती रक्कम लीन (फ्रीज) करून ठेवण्यात येईल, अशी ग्वाही दिली. तसेच ग्रामपंचायतीला थकित करापोटी जी रक्कम भारती डीफेन्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून येणे आहे. त्याचे पुरावे ग्रामपंचायत प्रशासनाने बँक ऑफ इंडियामार्फत बँक ऑफ बडोदाला पाठवावे. त्यानंतर ही रक्कम पुन्हा ग्रामपंचायत खात्यात जमा करण्यात येईल. अशा स्वरूपाचा मेल प्राप्त झाल्यावर उसगाव ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांनी उपोषण स्थगित केले.


चौकट
ग्रामनिधी खात्यात जमा
उसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य यांनी काल केलेल्या उपोषणामुळे बँक ऑफ इंडिया दाभोळ शाखेत ग्रामपंचायत उसगावच्या ग्रामनिधी खात्यात ६४ लाख ४७ हजार ८८० इतकी रक्कम आज जमा करण्यात आल्याची माहिती बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dattatray Bharane : 'भोंदूबाबा-महाराज हे सगळं झूट, पोरांनो त्यांच्या नादाला अजिबात लागू नका'; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सल्ला

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! सोनं-चांदी आणखी स्वस्त; पाहा आजचे ताजे भाव

April 2026 Calendar: हनुमान जयंती, अक्षय तृतीया ते सीता नवमी; आंब्याच्या मोसमातील खास सण आणि महत्त्वाचे दिवस जाणून घ्या

सोनम कपूरच्या घरी आला गोड पाहुणा, अभिनेत्री झाली आई, पोस्ट शेअर करत म्हणाली...

Satara ZP Controversy : मोठी बातमी! सातारा SP तुषार दोषींना 'सक्तीची रजा'; मंत्री शंभूराज देसाईंच्या आक्रमक पवित्र्यानंतर सरकारची कारवाई

SCROLL FOR NEXT