कोकण

काळ्या बुरशीने जनावरांचा मृत्यू?

CD

15508
सिंधुदुर्गनगरी : पत्रकार परिषदेत बोलताना भाजप राज्य उपाध्यक्ष अतुल काळसेकर. शेजारी जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, डॉ. प्रसाद देवधर.

काळ्या बुरशीने जनावरांचा मृत्यू?

अतुल काळसेकर; अहवालानंतर अंतिम स्पष्टता

ओरोस, ता. ११ ः चिंदर (ता. मालवण) येथे काळी बुरशी या आजाराने जनावरे दगावल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुणे येथील प्रयोगशाळेतून लवकरच याचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानंतर याची अंतिम स्पष्टता होईल. काळी बुरशी आलेला ओला चारा जास्त खाल्याने हा आजार झाल्याची माहिती जिल्हा बँक उपाध्यक्ष तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयातील उपाध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेला जिल्हा संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत, भगीरथ प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर उपस्थित होते. यावेळी काळसेकर म्हणाले, ‘‘हा प्रकार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गांभीर्याने घेतला असून भाजपच्या माध्यमातून दगावलेल्या प्रत्येक जनावरामागे पाच हजार रुपये आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. चिंदर गावात सध्या जिल्हा परिषद यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. डॉ. कांबळे हे सातत्याने तीन दिवस तेथे ठाण मांडून आहेत. त्यांच्या सोबत भाजपची यंत्रणाही आहे. उन्हाळ्यात ओला चारा नव्हता. त्यामुळे आता चारा उपलब्ध झाल्यावर तो जनावरांनी मोठ्या प्रमाणात खाल्ला. या चाऱ्यावर काळी बुरशी होती. त्यामुळे त्यांना ‘हिमोरेजिक फिवर’ झाला. त्यावर लस उपलब्ध आहे. याचे लसीकरण सुरू केले आहे; परंतु या लसीचा परिणाम जाणवायला किमान सात दिवसांचा कालावधी लागतो. तातडीने आजार बरा होत नाही.’’ काही दुभत्या गायी, म्हशी या आजारात दगावल्या आहेत. त्यामुळे वासरे अनाथ झाली आहेत. त्यांना दूध मिळणे कठीण झाले आहे. यासाठी ‘मिल्क रिप्लेसर’ हा उपाय आहे, असे सांगतानाच काळसेकर यांनी जिल्ह्यातील पशू पालकांनी चाऱ्याबाबत जागृत झाले पाहिजे. उन्हाळ्यात ओला चारा तयार केला पाहिजे. यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT