कोकण

खेड-बालिकेवर अत्याचार, तरुणाला 20 वर्षे सक्तमजुरी

CD

बालिकेवर अत्याचार,
तरुणाला २० वर्षे सक्तमजुरी

खेड न्यायालयाचा निकाल; डिसेंबर १७ मधील घटना

दाभोळ, ता. ११ ः जिल्ह्यातील एका ८ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वप्नील माने (वय २५) या युवकाला २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी ही शिक्षा सुनावली.
जिल्ह्यातील एका गावात आठ वर्षीय बालिका २८ डिसेंबर २०१७ ला सायंकाळी ६ वाजता शिकवणीला गेली होती. ही बालिका नैसर्गिक विधीसाठी गेली. त्यावेळी शिकवणी घेणाऱ्या महिलेच्या दिराने ही मुलगी शौचालयात ती एकटी असल्याचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मुलगी परत शिकवणीला आली, तेव्हा तेथील मुलांनी तिच्या पायावरील रक्ताचे डाग पाहिल्यावर तिला लागले असल्याचे शिकवणी घेणाऱ्या बाईंना सांगितले; मात्र त्यांना वेगळी शंका आल्याने त्यांनी तिला घरी नेऊन पालकांच्या ताब्यात दिले, मात्र या मुलीच्या वेदना थांबत नसल्याने पालकांनी तिच्याकडे चौकशी केली. त्यावेळी बालिकेने झालेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यांनी बालिकेला उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले. रात्री उशिरा दापोली पोलिस ठाण्यात या मुलीच्या पालकांनी संशयित स्वप्नील माने याच्या विरोधात तक्रार दाखल केली.
त्याच्यावर दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर खेड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी होऊन त्याचा निकाल लागला. स्वप्नील माने याला बलात्कारप्रकरणी दोषी ठरवून २० वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये यांनी केला होता. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता मृणाल जाडकर यांनी काम पहिले. दापोलीचे पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अंमलदार हेडकॉन्स्टेबल एस. बी. गायकवाड यांनी न्यायालयात काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US reduces tariff for India : मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा

Manipur Government Formation : भाजपकडून मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग!, 'NDA'चे सर्व आमदार दिल्लीत दाखल

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT