कोकण

राजापूर हायस्कूलचे विद्यार्थी रमले शेतात

CD

१४ (टुडे पान २ साठी)


-rat१८p११.jpg ः
23M16978
राजापूर ः शेतामध्ये शिक्षकांसमवेत भातलावणी करताना राजापूर हायस्कूलचे विद्यार्थी.
--------------

राजापूर हायस्कूलचे विद्यार्थी रमले शेतात

राजापूर, ता. १८ ः पुस्तकी ज्ञानासोबत मुलांना प्रत्यक्ष कामाची अनुभूती मिळावी आणि शेतीविषयी मुलांमध्ये आवड निर्माण होताना शेती क्षेत्राचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे या उद्देशाने येथील राजापूर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शेतीच्या कामांसह भातलावणीची अनुभूती घेतली. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी शेतकऱ्‍यांसोबत शेतामध्ये शेतीची कामे करताना शेतकऱ्याच्या श्रमाचे मुल्य अनुभवले.
प्रशालेचे विद्यार्थी हर्डी येथील शेतामध्ये सहभागी झाले. नांगरणीसह जमिनीची मशागत करणे, भातलावणी करणे आदी विविध प्रकारची मशागतींची कामे केली. या वेळी विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही शेतीच्या कामांचा अनुभव घेतला. यामध्ये संस्था समन्वयक मानसी हजेरी, उपमुख्याध्यापक अरूण पोवार, विज्ञान शिक्षक भरत जानकर, गिरीष भातडे, प्रवीण बाणे, सुजित पारकर, मदलसा करंगुटकर यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमाचे राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह प्रकाश भावे, संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षा डॉ. छाया जोशी, कार्यवाह जगदीश पवार, मुख्याध्यापक जगदीश भालशंकर आदींनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिक्षक मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्याला हटवलं, मतमोजणीच्या आधी भाजपच्या बंडखोर नेत्याने केलेली IAS विरोधात तक्रार

Sugarcane Price Protest : 'स्वाभिमानी'ने दिल्लीला जाणारा 30 टन साखरेचा ट्रक 5 मैल परिसरात पाठलाग करून अडवला; कर्नाटकातून मिरज रेल्वेस्थानकाकडे निघाला होता ट्रक

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आजपासून पूर्णेकर कुटुंबाचे आंदोलन

Ujani Dam: उजनीत १०३ टीएमसी पाणीसाठा; कर्नाटकची सात टीएमसीची मागणी, ३० ऑक्टोबरला निर्णयाची शक्यता

मानधन वाढवून मागितलं अन् नाटकातून काढलं! ‘आमने सामने’मधून रोहन गुजर, केतकी पालव रिप्लेस; म्हणाले…'शेवटचं गुडबायही करता आलं नाही ’

SCROLL FOR NEXT